esakal | स्वीडनमध्येही घुमला ढोल ताशांचा गजर...

बोलून बातमी शोधा

Dhol Tasha Practice At Sweden

'स्कोने ढोल-ताशा मंडळाने' या मिरवणुकीमध्ये मराठी ढोल, ताशा, लेझीम आणि झान्ज खेळून मराठी परंपरेचे दिमाखदार प्रदर्शन केले. सर्व बायकांनी नऊवारी साडी-नथ-फेटा असा मराठमोळा वेष परिधान केला होता. तर पुरुषांनी पांढरा झब्बा परिधान केला होता.

स्वीडनमध्येही घुमला ढोल ताशांचा गजर...
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

युरोपखंडातील स्वीडनमधील लँड्सक्रोना या शहरात दरवर्षी उन्हाळ्यात तीन दिवसांचा कार्निवल असतो. त्यावेळी जगभरातून वेगवेगळ्या देशांतील कलाकार आपापल्या कलेचे प्रदर्शन करतात. या कार्निवलचा महत्वाचा भाग म्हणजे मिरवणूक. स्वीडन मधील लूंड या शहरातील हौशी मराठी मंडळींनी यावर्षी 'स्कोने ढोल-ताशा मंडळाची' स्थापन केली.   

'स्कोने ढोल-ताशा मंडळाने' या मिरवणुकीमध्ये मराठी ढोल, ताशा, लेझीम आणि झान्ज खेळून मराठी परंपरेचे दिमाखदार प्रदर्शन केले. सर्व बायकांनी नऊवारी साडी-नथ-फेटा असा मराठमोळा वेष परिधान केला होता. तर पुरुषांनी पांढरा झब्बा परिधान केला होता. यामध्ये मुलेही मागे नव्हती, त्यांनीपण झब्बा-फेटा असा वेष परिधान करून भारतीय तिरंगा तसेच केशरी ध्वज फडकविण्याचे महत्वाचे काम केले! महिलांनी लेझीम आणि झान्ज घेऊन नयनमनोहर अविष्कार सादर केले. तर पुरुषांनी शंख, ढोल आणि ताशा वाजवून प्रेक्षकांना महाराष्ट्रीयन केलेचे सांस्कृतिक दर्शन घडवले. लँड्सक्रोनाचा परिसर ढोल-ताशाच्या आवाजाने, तसेच गणपती बाप्पा मोऱ्या, जय शिवाजी, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... अशा मराठी घोषणांनी दुमदुमून गेला होता. 

युरोपीय रहिवास्यांनी ढोलाच्या ठेक्यावर ताल धरत, मराठी वेषभूषेचे कौतुक करत मराठी मंडळींना उस्फुर्त दाद दिली. त्यासाठी पुण्यामधून ढोल, ताशा, लेझीम इत्यादी साहित्य युरोपमध्ये नेण्यात आले. युरोप मधले नियम फार कडक आहेत. जर रस्त्यावर एखादे वाद्य वाजवायचे असेल, तर त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते! स्कोने ढोल-ताशा मंडळाने या कार्यक्रमासाठी युरोप मधील असे सर्व कडक नियम पाळून खूप सरावही केला होता.