सिडनीमध्ये दिवाळीचा उत्सव; ओपेरा हाऊसला केली विद्युत रोषणाई

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

भारत सरकारच्या वाणिज्य दूतावासातर्फे दिवाळीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राच्या कलाकारांनी खास दिवाळीच्या निमित्ताने केलेले भारतीय नृत्य व कलांच्या सादरीकरण व्हिडीओ दाखविण्यात आले.​

पुणे : कोरोनाचा प्रभाव असताना देखील भारतात दिवाळी उत्साहात साजरी झाली. मात्र ऑस्ट्रेलियातील सिडनी येथेही दिवाळीचे नवे रंग अनुभवण्यास आले. दिवाळीच्या कार्यक्रमात थेट ऑस्ट्रेलिया सरकारचा सहभाग, ओपेरा हाऊसला केलेली विद्युत रोषणाई अन भारतीय नृत्य व कलांचे भारदस्त व्हर्च्युअल सादरीकरणाचे यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. 

भारत सरकारच्या वाणिज्य दूतावासातर्फे दिवाळीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राच्या कलाकारांनी खास दिवाळीच्या निमित्ताने केलेले भारतीय नृत्य व कलांच्या सादरीकरण व्हिडीओ दाखविण्यात आले.

व्वा, खगोलप्रेमाला उमपा नाही! पुण्यातील 3 वर्षांच्या राध्यनीने रचला जागतिक विक्रम​

या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्काॅट माॅरिसन यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देत म्हणाले, ''जगभरात कोरोनाचे संकट असताना दिवाळीच्या निमित्ताने आपल्या भविष्याबद्दल सकारात्मक झालो आहोत. त्यामुळे या कार्यक्रमास विशेष महत्त्व आहे." 

सांस्कृतिक मंत्री जिओफेरी ली यांनी देखील या व्हर्च्युअल कार्यक्रमात भारतीयांना शुभेच्छा देत ऑस्ट्रेलियातील बहुसांस्कृतिक समाजात भारतीयांचे योगदान महत्वाचे आहे असे सांगितले. 

Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

कार्यक्रमाचे आयोजक भारताचे वाणिज्य दूत मनिष गुप्ता यांनी या कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट करत ऑस्ट्रेलिया सरकारचे सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हाॅकले, स्वामी विवेकानंद केंद्राचे संचालक रामानंद गर्गे, सिडनी एअरपोर्टचे बांधकाम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. विजय जोशी आदी यावेळी उपस्थित होते. 

भारत सरकारने २०१५ मध्ये स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राची स्थापना केली आहे. त्याचे पहिले संचालक रामानंद गर्गे 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, "पूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये दिवाळी साजरी केली जायची पण यंदापासून ऑस्ट्रेलिया सरकारने यात सहभाग घेतला. ओपोरा  हाऊसला १४ नोव्हेंबरची संपूर्ण रात्र विद्युत रोषणाई करून भारताचा सन्मान केला. यापुढे प्रत्येक वर्षी दिवाळीत शासकीय सहभाग असणार आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यादोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे.

स्वामी विवेकानंद केंद्र कलाकारांनी सादर केलेले भरतनाट्यम, कथ्थक, मणिपुरी नृत्य आणि कर्नाटकी वाद्यांचे भारदस्त सादरीकरणाचे रेकार्डेड व्हिडीओ दाखविण्यात आले. सिडनीसह पर्थ, मेलबर्न, येथेही कोरोनाच्या नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali celebrations in Sydney