esakal | 'साखर खाल्लेला माणुस'चा न्यू जर्सीतील यशस्वी प्रवास... 
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Article for Pailteer 'Sakhar khallela maanus'

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी 'साखर खाल्लेला माणुस' या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. हे नाटक मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या जीवनातील रोजचा संघर्ष आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जाताना वडील आणि मुलगी यांच्यातील नाते यावर भाष्य करणारे आहे. विषयातील वस्तुस्थिती, कलाकार आणि प्रभावी संभाषण यामुळे हे नाटक प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरले आहे.

'साखर खाल्लेला माणुस'चा न्यू जर्सीतील यशस्वी प्रवास... 

sakal_logo
By
रवी यंदे

न्यु जर्सी येथील मराठी विश्व मंडळाने यावर्षीची दिवाळी 'साखर खाल्लेला माणुस' या विशेष मराठी नाटकासह साजरी केली. या नाटकासाठी पुरस्कारप्राप्त मराठी अभिनेता प्रशांत दामले आणि पुण्यातल्या कलाकारांच्या टीमने 'साखर खाल्लेला माणुस'चे प्रयोग सादर केले. अमेरिकेतील या नाटकाचे सर्व शो हाउसफुल झाले. वेस्ट विंडसर प्लेन्सबोरो हायस्कूलच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह शोमध्ये न्यू जर्सी, न्यूयॉर्क येथील मराठी समुदायापुढे हे विनोदी, हलकेफुलके, कौटूंबिक नाटक सादर करण्यात आले. 

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी 'साखर खाल्लेला माणुस' या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. हे नाटक मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या जीवनातील रोजचा संघर्ष आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जाताना वडील आणि मुलगी यांच्यातील नाते यावर भाष्य करणारे आहे. विषयातील वस्तुस्थिती, कलाकार आणि प्रभावी संभाषण यामुळे हे नाटक प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरले आहे. प्रशांत दामले यांच्यासोबतच या नाटकात दामले यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री शुभांगी गोखले, दामलेंच्या संभाव्य जावयाची भुमीका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि मुलीची भूमिका रुचा आपटेनी साकारली आहे.

'मराठी विश्वने घेतलेल्या प्रयत्नांसाठी आणि नाटकाला दाखवलेल्या प्रेमासाठी मी त्यांचा आभारी आहे.' असे अभिनेता प्रशांत दामले म्हणाले. या नाटकात त्यांची भूमिका एका रागीट नवऱ्याची आहे. अशा प्रकारच्या भूमिकेत यापूर्वी पडद्यावर प्रेक्षकांनी मला बघितले नसल्याने अशा प्रकारची भूमिका साकारणे आव्हानात्मक आहे तसेच या नाटकाचा विषय लोकांना अधिक जवळचा वाटतो. म्हणून लोक आमच्या नाटकाशी जोडले गेले आहेत व ते हा विषय समजून घेत आहेत. या नाटकात दाखवल्या गेलेल्या गोष्टी अनेक कुटूंबांचा रोजचा अनुभव आहे, असे प्रशांत दामले यांनी म्हटले. 

नाटकाबद्दल बोलताना दामले म्हणाले, एखाद्या व्यक्तीला मंचावर सादरीकरण करण्यासाठी उत्साहपूर्ण काम करावे लागते. नाटकं माझ्यासाठी अधिक आव्हानात्मक असतात, टि.व्ही. किंवा चित्रपटांप्रमाणे रिटेकची सोय इथे नसते. 

या नाटकाच्या निमित्ताने मराठी विश्वचे संस्थापक यंदे दांपत्य यांना दामलेंना भेटण्याची संधी मिळाली होती. प्रत्येक प्रयोग करताना दामले यांनी प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांचे सादरीकरण नेहमी ताजे आणि मनोरंजक असते, असे मराठी विश्वचे संस्थापक चंद्रकांत यंदे म्हणाले. 

मी अनेक वर्षांपासून प्रशांत दामले यांना फॉलो करत आहे. मी पुण्याला जाते तेव्हाही मी नेहमी त्यांची नाटकं पाहण्याचा प्रयत्न करते. ते महाराष्ट्राचा अभिमान आहेत. मराठी विश्वला खूप गर्व आहे की त्यांनी न्यू जर्सीत सादरीकरण केले. मराठी विश्वला 2018 मध्ये 40 वर्ष पूर्ण होतील. चार दशकांपूर्वी यंदे यांच्या घरातून ज्या संघटनेची सुरुवात झाली त्या संस्थेसाठी हे एक मोठे यश आहे. 'आम्ही पुढच्या वर्षी संस्थेला 40 वर्ष होतील म्हणून उत्साहित आहोत. इतके वर्ष ही यशस्वी वाटचाल घडेल याची आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती,' अशा भावना श्रीमती यंदे यांनी व्यक्त केल्या.