esakal | सरे काउंटी मध्ये प्रथमच सार्वजनिक गणपतीची स्थापना!
sakal

बोलून बातमी शोधा

Surrey Ganesh Mandal celebrate ganshotsav at uk

सरे काउंटी मध्ये प्रथमच सार्वनिकरित्या गणपतीची स्थापना करण्यात आली. उत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करतण्यात आले होते.

सरे काउंटी मध्ये प्रथमच सार्वजनिक गणपतीची स्थापना!

sakal_logo
By
संदेश संखे

लंडन : सरे काउंटी मध्ये प्रथमच सार्वनिकरित्या गणपतीची स्थापना करण्यात आली. उत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करतण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांसह वृद्धांनीही सहभाग घेतल्याने कार्यक्रमामध्ये रंगत आली होती.

येथील चार कुटुंबांनी एकत्र येवून सार्वनिक गणपती उत्सव साजरा करण्याचे ठरविले. परिसरात राहणाऱ्या भक्तांच्या सहकार्याने community interest company ची नोंद केली आणि सरे गणेश मंडळ असे नाव दिले. दीड दिवसाच्या या उत्सवात मंडळाने वाजत गाजत इको फ्रेंडली बाप्पाचे स्वागत करून विधीवत स्थापना केली. दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला.

पहिल्या दिवशी संध्याकाळी महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 375 हून अधिक भक्तांनी बाप्पाचे दर्शन घेतले. दुसऱया दिवशी अथर्वशीर्ष पठण आणि भजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. उत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचे फेसबुक लाईव्ह करण्यात आले होते. आल्पोपहाराचा भक्तांनी लाभ घेतला. बाप्पाची विधीवत पूजा करून लेझिम आणि नृत्याच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली होती. थेम्स नदी मध्ये बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भाविकांनी गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकरच या.... अशा घोषणा दिल्या.