'ओएमपीईजी'चा द्वितीय वर्धापनदिन उत्साहात साजरा

शनिवार, 14 एप्रिल 2018

OMPEG या संस्थेचा द्वितीय वर्धापनदिन 7 एप्रिल रोजी मिल्टन कीन्स फुटबॉल स्टेडियम येथे साजरा करण्यात आला. या समारंभात उदय ढोलकिया व वसंत वसंत लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जाणून घेऊयात OMPEGच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याबद्दल.... यु.के.मधील काही उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन OMPEG (ओएमपीईजी) ही महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था लंडनमध्ये 2016ला स्थापन केली.

OMPEG या संस्थेचा द्वितीय वर्धापनदिन 7 एप्रिल रोजी मिल्टन कीन्स फुटबॉल स्टेडियम येथे साजरा करण्यात आला. या समारंभात उदय ढोलकिया व वसंत वसंत लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जाणून घेऊयात OMPEGच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याबद्दल....

यु.के.मधील काही उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन OMPEG (ओएमपीईजी) ही महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था लंडनमध्ये 2016ला स्थापन केली.

OMPEG (Overseas Maharashtrian Professionals and Entrepreneurs Group) या संस्थेचा उद्घाटन सोहळा 10 एप्रिल 2016 रोजी लंडन येथील सडबरी गोल्फ क्लबवर संपन्न झाला. या संस्थेचा पहिला वर्धापनदिन 19 एप्रिल 2017 रोजी मोठ्या दिमाखात लॉर्डसवर साजरा करण्यात आला होता.

दुसरा वर्धापनदिन साजरा
सूत्र संचालन

OMPEG या संस्थेचे संस्थापक सभासद अनिरुद्ध कापरेकर, रेश्मा देशपांडे, सुशील रापतवार, जय तहसीलदार, रविंद्र गाडगीळ व दिलीप आमडेकर यांनी द्वितीय वर्धापनसोहळ्याचे संचालन केले. या सोहळ्याचं चित्रिकरण आणि प्रक्षेपण डॉ. विजेंद्र इंगळे यांनी केले.

OMPEGची वाटचाल आणि 'अ‍ॅपचे उद्घाटन'
युकेमधील विविध भागातून आलेल्या दोनशेहून अधिक महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांनी या समारंभात हजर राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या दोन वर्षात साध्य केलेल्या समूहाचे महत्त्वाचे टप्पे उपस्थित प्रेक्षकांसमोर मांडले गेले.

OMPEGची सुरुवात झाल्यापासून सुमारे 20 कार्यक्रम आयोजित करताना व्हॅल्यूलिटींग, टॅक्स प्लॅनिंग, सेवानिवृत्ती प्लॅनिंग टू मॉर्टगेज, यासारख्या विविध विषयांवर मूल्यवर्धन आणि ज्ञान वाटण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधत कार्यकर्ते सुशील रापतवार यांनी OMPEGच्या ‘अ‍ॅप’ चे उद्घाटन केले.

OMPEGचा उद्देश
OMPEGचा उद्देश यु.के. मध्ये असलेल्या बहु-प्रतिभावान महाराष्ट्रीयन समुदायात उद्योजकांना उत्तेजन देणे आणि प्रोत्साहित करणे हे आहे.

प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन
वसंत वसंत लिमये यांनी आयआयटी पवई येथून त्यांनी पदवी घेतली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांची पुस्तके वाचून गिर्यारोहणाची आवड निर्माण झाल्याने त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या.

व्यावसायिक आणि उद्योजकांना विविध आव्हाने स्वीकारावी लागतात. याच धर्तीवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित वसंत वसंत लिमये यांनी त्यांचे विचार प्रेक्षकांसमोर मांडले. व्यावसायिक गिर्यारोहण करणारे आणि लॉक ग्रिफीनचे लेखक लिमये यांचे भावनोत्कट विचार आणि संदेश उत्साही आणि आनंददायक होते.

OMPEG ऑनर्स पुरस्कार
डॉ. विजेंद्र इंगळे, केदार लेले, निखिल काळुसकर, रंजिता दळवी, संजय रोडे आणि तुषार गडीकर, राहुल इथापे, सचिन कदम आणि सुजय सोहनी यांना त्यांच्या योगदानाबद्दल OMPEGऑनर्स ने पुरस्कृत करण्यात आले. विविध प्रकारांतील पुरस्कारांच्या माध्यमातून या सर्व महाराष्ट्रीयन उद्योजक आणि त्यांच्या व्यावसायिक उपक्रमांची दखल घेतली गेली आणि त्यांना मानचिन्ह देण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता
या कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी उपस्थित व्यावसायिक व उद्योजकांनी, मिल्टन कीन्स फुटबॉल स्टेडियमच्या इव्हेन्ट मॅनेजमेंट टीमने आयोजित केलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला.

संचालन आणि कार्यकर्ते : अनिरुद्ध कापरेकर, रेश्मा देशपांडे, सुशील रापतवार, जय तहसीलदार, रविंद्र गाडगीळ आणि दिलीप आमडेकर.

छायांकन: सुधीर बर्वे, डॉ. विजेंद्र इंगळे, विहंग इंगळे आणि चिन्मय पंडित.

प्रयोजक पुढीलप्रमाणेः
जय तहसीलदार - मर्क्युरिअस आयटी
राहुल इथापे - नक्षी.कॉम
अनिरुद्ध कापरेकर - बॅनियन ट्री अँड अन्सर्स
दिलीप आमडेकर
रंजिता दळवी - दळवी वेल्थ मॅनेजमेंट
रेणुका फडके - व्ही आर मॉर्टगेज सोल्युशन्स
माधवी आमडेकर आणि रवी गाडगीळ - कोलंबस इंटरनॅशनल
अक्षय शहा - एस अकाऊंट्स अँड टॅक्स
मिलिंद कांगले आणि मार्क  ओलेफसन- टूटूम होम
विजेंद्र इंगळे आणि विहंग इंगळे - माय मराठी
सुजय सोहनी आणि सुबोध जोशी - श्रीकृष्ण वडा पाव
अमन सिंह - KNAV
संजय रोडे - पायोनियर