विविधरूपी मूर्ती साकारण्यात पाडळकर यांचा हातखंडा

बी. डी. चेचर
Tuesday, 11 September 2018

कोल्हापूर - गणशोत्सव चार-पाच दिवसांवर आला आहे. सध्या छापांचा वापर करून गणेशमूर्ती तयार करण्याचा कल वाढला असला तरी गंगावेशीतील प्रकाश पाडळकर यांनी हाताने गणेशमूर्ती तयार करण्याची परंपरा जपली आहे. शहरातील विविध पेठांतील मंडळाच्या गणेशमूर्ती श्री. पाडळकर यांच्या घरी तयार होतात. सध्या त्यांच्याकडे तब्बल अठरा गणेश मंडळांनी मूर्तीसाठी नोंदणी केली आहे. 

कोल्हापूर शहरात गणेश उत्सावानिमित्त अनेक वर्षे पेठांत विविध देखावे सादर करण्याची परंपरा आहे. परंतु काही वर्षांपासून बुधवारपेठ, मंगळवारपेठ, शनिवारपेठ या भागात कलात्मक गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा वाढत आहे आणि त्यासाठी विविध रूपांतील गणेशमूर्ती बनविण्याचा हातखंडा असलेल्या पाडळकरांकडे वर्षानुवर्षे कलात्मक मूर्तीत वाढच होत आहे, प्रकाश धोंडिराम पाडळकर हे लहानपणा पासूनच कलात्मक गणेशमूर्ती बनविण्याची त्यांची खासियत आहे. पंधरा वर्षे सातत्याने अखंडपणे मूर्ती बनविण्याचे काम करतात. 

पाडळकर हे सायंकाळी चार पाच वाजता काम सुरू करतात आणि पहाटे संपवतात. ते दिवसा काम करत नाहीत फक्त रात्रीच काम करतात. कोणताही छाप न वापरता चार फुटांपासून ते दहा फुटांपर्यंत विविध रूपांतील कलात्मक मूर्ती घरातील महिला व दोन सहकाऱ्यांसोबत करतात.

कोणत्याही छापाचा आधार न घेता विविध रूपांतील कलात्मक गणेशमूर्ती बनविताना खूप आनंद मिळतो, तरुणांनी अशा प्रकारची कला जिवंत ठेवून कलेचा आनंद लुटावा.
-प्रकाश पाडळकर,
मूर्तिकार.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Special Padalkar success story