साताराः गौरी व घरगुती गणेश विसर्जनानंतर मंडळांची लगबग सुरू

सचिन शिंदे
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

कऱ्हाड (सातारा): गौरी व घरगुती गणेश विसर्जनानंतर आता उर्वरीत पाच दिवसात शहरात देखावे खुले करण्यासाठी मंडळांची लगबग सुरू आहे. जीवंतलव हलत्या देखाव्यांना विंडबन व विनोदाची किनार आहे. आज व उद्यापासून ते खुले होतीलही मात्र पाऊस नसले तर लोक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतील, अशी स्थिती आहे.

कऱ्हाड (सातारा): गौरी व घरगुती गणेश विसर्जनानंतर आता उर्वरीत पाच दिवसात शहरात देखावे खुले करण्यासाठी मंडळांची लगबग सुरू आहे. जीवंतलव हलत्या देखाव्यांना विंडबन व विनोदाची किनार आहे. आज व उद्यापासून ते खुले होतीलही मात्र पाऊस नसले तर लोक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतील, अशी स्थिती आहे.

शहरात सुमारे ३५० सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. त्यात बहुतांशी गणेश मंडळांनी हलत्या व पौराणीक देखाव्यांवर भर दिला आहे. पोलिसांनाही उत्सव काळातील बंदोबस्त चोख ठेवला आहे. फिरती दहा पथक पट्रोलींग करून गर्दीतील अनिष्ठ प्रकारावर नियंत्रण ठेवणार आहेत. गुंडा विरोधी पथक त्यांच्या परिने साध्या वेशात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालणार आहेत. महिलांच्या छेडछाडी विरोधैतील पथक पूर्ण क्षमतेने स्वतंत्र पणे कार्यरत राहणार आहे. निर्भया पथकावर ती जबाबदारी देण्यात आली आहे. त्याशिवाय आझाद चौक, दत्त चौक, दर्गा मोहल्ला, कार्वे नाका, चावडी चौक येेेथे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. काही ठिकणी छावणी टाकून बंदोबस्त ठेवला आहे.

शहरात अनेक मंडळ त्यांचा रौप्य महोत्सव साजरा करत आहेत. त्यात सुदर्शन गणेश मंडळही आहे. त्यांनी व्याख्यानांसह वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. अनेक देखावे विडंबनावर अवलंबून आहेत. काही ठिकाणी जीवंत देखावे तेही विनोदी किनार ठेवून साकरले आहेत. काही गणेश मंडळांनी मोठ्या प्रतिकृती उभारल्या आहेत. त्यात  मध्यवर्ती आझाद चौकातील नवजवान गणेश नवरात्र उत्सव मंडळाने मोठी स्वामी समर्थांची प्रतिकृती उभी केली आहे. विठ्ठल चौकात आकर्षक देखावा आहे. मंगळवार पेठेत खंडोबाचा हलता देखावा केला आहे. कमानी मारूती मंदीर चौकातही देखवा आहे.

बहुतांशी गणेश मंडळाचे कार्यकर्ते देखाव्यावेळी स्वयंसेवक म्हणून काम करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळी पोलिसांना त्यांचा आधार असतो. तशीच स्थीती याहीवेळी असेल, असे गणेश मंडळाच्या हालचालीवरून दिसते आहे.

Web Title: satara news karad ganesh festival 2017