
एक ते पाच पर्यंत च्या सर्व विजयी मल्लाना प्रताप कदम यांच्यातर्फे कायम स्वरुपी चषक देण्यात आले.
कोकरुड (सांगली) : कुस्ती हेच जीवन महासंघा च्यावतीने तुरूकवाडी (ता. शाहूवाडी) येथे झालेल्या राज्यातील पहिल्या अधिकृत ऑनलाईन कुस्ती मैदानात प्रथम क्रमाकांच्या लढतीत विकास पाटील (मांगरूळ) विरूद्ध सुदेश ठाकुर यांच्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत सुदेश ठाकुर यास गुणावर विजयी घोषित करण्यात आले.
दुसऱ्या क्रमांकाची उदय खांडेकर (वारणानगर) विरूद्ध अजित पाटील (कोल्हापुर) अशी कुस्ती पंधरा मिनीटानी गुणावर घेण्यात आली. त्या मध्ये अजित पाटील याने पहिला गुण घेतल्याने पंचानी त्यास विजयी घोषित केले. तिसऱ्या क्रमाकांच्या लढतीत अमर पाटील (कोल्हापुर) याने प्रदीप ठाकुर (सांगली) याच्यावर छड़ी टांग डावाने 11 व्या मिनिट ला विजय मिळवला. चार नंबरसाठी झालेल्या लढतीत संदीप बंडगर याने तात्या इंगळे यास 13 व्या मिनिटला चितपट केले. पाचव्या क्रमाकांच्या लढतीत पै.सौरभ सव्वाशे (पुणे) याने पै. विनायक जोग (इचलकरंजी) याच्यावर ढाक डावाने विजय मिळवला.
हेही वाचा - मी, माझी पत्नी आणि वडील या अपघातामुळे धास्तावलो आहोत
एक ते पाच पर्यंत च्या सर्व विजयी मल्लाना प्रताप कदम यांच्यातर्फे कायम स्वरुपी चषक देण्यात आले. मैदानातील इतर विजयी मल्ल असे ओमकार जाधव, विकी थोरात, विकास मोरबाळे, सूरज पाटील, विवेक लाड, नेताजी भोसले, आदित्य नायकवडी, अनिरुद्ध शिंदे, नयन माईगडे, साहील पाटील, यशराज खबाले, प्रतीक शिंदे, राजवर्धन पाटील, संकेत नेर्लेकर, ओमकार पाटील, अजिंक्य गायकवाड, विनय पाटील. प्रारंभी कुस्ती मैदानाचे पूजन राज्य अध्यक्ष रामदास देसाई, मनोज मस्के, अशोक सावंत, शरद पाटील हंबीरराव पाटील, या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कुस्ती साठी योगदान दिल्या बद्दल पत्रकार मतीन शेख (सोलापुर), पत्रकार फिरोज मुलानी (औंध), पांडुरंग पाटील (कोतोली), सुरेश जाधव (चिंचोली) तर मनोज मस्के यांना कुस्ती रत्न पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात आला. अनिल पाटील,अशोक पाटील, महादेव मोरे, संपत पाटील, चंद्रकांत पाटील, दत्ता पाटील, संग्राम देसाई, दगडू माईगडे, बाबाजी पाटील, भगवान पाटील यांनी संयोजन केले. पंच म्हणून बाजीराव पाटील,विश्वास माईगडे, बाजीराव कलंत्रे, रंगराव पाटील, यांनी काम पाहिले.
मैदानासाठी दत्त उधोग समुहाचे संस्थापक आनंदराव माईगडे, कोल्हापुर जिल्हा परिषदेचे सभापती हंबीरराव पाटील,जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव पाटील, ओलिम्पिक वीर बंडा पाटील, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग, जालिंदर पाटील, अशोक पाटील, राहुल जाधव, सुरेश जाधव, विकासराव पाटील (मोहरेकर) विश्वजित पाटील, तानाजी चावरे, हे प्रमुख उपस्तित होते.
हेही वाचा - नऊ तोळ्यांचे दागिणे चोरणाऱ्या एकास अटक
संपादन - स्नेहल कदम