चित्रपट व्यवसाय दिनानिमित्त कॅमेरा स्तंभाचे पूजन 

कोल्हापूर ःअखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रपट व्यवसाय दिनानिमित्त शुक्रवारी खरी कार्नर येथील कॅमेरा स्तंभाला वंदन करण्यात आले. यावेळी संयोगिताराजे छत्रपती, यशवंत भालकर, चंद्रकुमार नलगे तसेच चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी.
कोल्हापूर ःअखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रपट व्यवसाय दिनानिमित्त शुक्रवारी खरी कार्नर येथील कॅमेरा स्तंभाला वंदन करण्यात आले. यावेळी संयोगिताराजे छत्रपती, यशवंत भालकर, चंद्रकुमार नलगे तसेच चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी.

कोल्हापूर - कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी भारतीय बनावटीचा कॅमेरा बनवून चित्रपट निर्मितीला चालना दिली. त्याचे प्रतीक म्हणून दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस चित्रपट व्यवसाय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे खरी कॉर्नर येथील कॅमेरा स्तंभाचे पूजन संयोगीताराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कलावंतांनी कोल्हापूरच्या चित्रपट परंपरेतील आठवणींना उजाळा दिला. 

कोल्हापूरच्या कलानगरीने अनेक कलाकृतींची निर्मिती व जोपासना केली आहे. कलेला भाषा, जात, प्रांत नसतो. कला पाण्यासारखी निर्मळ असते. त्यामुळे कलेच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन होऊ शकते आणि त्याचे योग्य माध्यम म्हणून चित्रपट निर्मितीलाही येथे बळ दिले. एखाद्या विषयाचे गांभीर्य किंवा त्याबद्दलची योग्य-अयोग्य अशी विचारसरणी अवघ्या 3 तासांत दाखवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून चित्रपटांना आजही पसंती आहे. त्याचे प्रतीक म्हणून आज येथे कॅमेरास्तंभाला वंदन करण्यात आले, अशा भावना सहभागी कलावंतांनी व्यक्त केल्या. 

देशाच्या चित्रपट इतिहासात अस्सल भारतीय बनावटीचा कॅमेरा निर्मिती करणारे बाबूराव पेंटर यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्यानंतरच्या पिढीनेही येथील चित्रपट परंपरा अधिक भक्कम करण्यास हातभार लावला. यात चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, बाबा गजबर, अनंत माने, सी. रामचंद्र, लता मंगेशकर, आशा भोसले, रवींद्र मेस्त्री ते आताच्या नवोदित कलाकारांचे योगदान मोठे आहे. 

छत्रपती राजाराम महाराज यांनी कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 1933 मध्ये कोल्हापूर सिनेटोनची स्थापना केली. त्यात त्यांच्या भगिनी अक्कासाहेब महाराज यांचेही मोलाचे सहकार्य होते आणि तीच परंपरा पुढे शहाजी महाराज यांनी सुरू ठेवली. भालजींचे आणि शहाजी महाराज यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. जगत्‌विख्यात छत्रपती शिवाजी या ऐतिहासिक चित्रपटासाठी शहाजी महाराजांनी नवीन राजवाड्यातील सर्व वस्तू भालजी पेंढारकर यांना चित्रीकरणासाठी वापरण्यास दिल्या होत्या. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या छत्रपती घराणे आणि कोल्हापूर चित्रसृष्टीचे जिव्हाळ्याचे नातेसंबंध दृढ करतात. कार्यक्रमप्रसंगी संयोगीताराजे छत्रपती यांनी ज्येष्ठ चित्रपट कलाकारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com