‘कथा बिलासखानी तोडीची’ तृतीय

रविवार, 4 मार्च 2018

कोल्हापूर - सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे झालेल्या ५७ व्या महाराज्य संगीत नाटक स्पर्धेत एमसीजीएम संगीत व कला अकादमी, मुंबई संस्थेने सादर केलेल्या ‘संगीत पंडितराज जगन्नाथ’ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला.

कोल्हापूर - सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे झालेल्या ५७ व्या महाराज्य संगीत नाटक स्पर्धेत एमसीजीएम संगीत व कला अकादमी, मुंबई संस्थेने सादर केलेल्या ‘संगीत पंडितराज जगन्नाथ’ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला.

अखिल भारतीय चित्तपावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी यांच्या ‘संगीत मानापमान’ला द्वितीय, तर देवल स्मारक मंदिर सांगलीच्या ‘संगीत कथा बिलासखानी तोडीची’ नाटकास तृतीय क्रमांक मिळाला. केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या स्पर्धेत एकूण २० प्रयोग सादर झाले. विजय कुलकर्णी, दीपक कलढोणे, अनिरुद्ध खरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 

निकाल असा ः वैयक्तिक पारितोषिके ः दिग्दर्शन ः प्रथम- सुवर्ण गौरी घैसास (नाटक- संगीत पंडितराज जगन्नाथ), द्वितीय- ॲड. अमित सावंत (संगीत मत्स्यगंधा). नेपथ्य ः प्रथम- दाद लोडगे (संगीत लावण्या सखी), द्वितीय- सुधीर ठाकूर (संगीत पंडितराज जगन्नाथ). नाट्यलेखन ः प्रथम- विद्या काळे (संगीत फुलले प्रेम पाषाणी), द्वितीय- अमेय घोपटकर (संगीत लावण्य सखी). संगीत दिग्दर्शन ः प्रथम- शरद बापट (संगीत कथा ही बिलासखानी तोडीची), द्वितीय- श्रीनिवास जोशी (मानापमान). 

संगीत साथ ऑर्गन ः प्रथम- विलास हर्षे (मानापमान), द्वितीय- विशारद गुरव (संगीत पंडितराज जगन्नाथ). तबला- निखिल रानडे (मानापमान), द्वितीय- दत्तराज शेट्ये (संगीत संशयकल्लोळ). संगीत गायन रौप्यपदक- प्रवीण शिलकर (मानापमान), अभिषेक काळे (कथा बिलासखानी तोडीची), सिद्धी बोंद्रे (मानापमान), श्रद्धा जोशी (कथा बिलासखानी), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक- दिगंबर परब (संशयकल्लोळ), भालचंद्र उसगावकर (ययाती देवयानी), सोनिया शेट्ये (संशयकल्लोळ), निवेदिता चंद्रोजी (मत्स्यगंधा). 

गायन गुणवत्ता प्रमाणपत्र- सिद्धी पारसेकर, संचिता जोशी, स्मिता कदम, श्रद्धा जोशी, मीनल कामत, दशरथ नाईक, मिलिंद करमरकर, केदार पावनगडकर, दशरथ राऊत, विश्‍वनाथ दाशरथे. 

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र ः सीमा बर्वे, मेधा पारर्सेकर, गीताजी मातोंडकर, वैशाली आजगावकर, श्रीयंका देसाई, चंद्रशेखर गवस, अविनाश पवार, कबीर जगताप, चिन्मय आपटे, नितीन जोशी.