सळसळत्या ऊर्जेचं नाटक...!

संभाजी गंडमाळे 
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

गेल्या दोन-तीन वर्षांत स्पर्धेतून तरुणाई मोठ्या प्रमाणावर रंगमंचावर येते आहे. अर्थातच यंदाची स्पर्धाही त्याला अपवाद नाही. मात्र, शिवम्‌ नाट्य संस्थेच्या सचिन निकम लिखित, दिग्दर्शित ‘मन प्रश्‍नाच्या पटलावर’ या नाटकातून आजच्या तरुणाईची सळसळती ऊर्जा खऱ्या अर्थाने सर्वांनाच अनुभवायला मिळाली.

गेल्या दोन-तीन वर्षांत स्पर्धेतून तरुणाई मोठ्या प्रमाणावर रंगमंचावर येते आहे. अर्थातच यंदाची स्पर्धाही त्याला अपवाद नाही. मात्र, शिवम्‌ नाट्य संस्थेच्या सचिन निकम लिखित, दिग्दर्शित ‘मन प्रश्‍नाच्या पटलावर’ या नाटकातून आजच्या तरुणाईची सळसळती ऊर्जा खऱ्या अर्थाने सर्वांनाच अनुभवायला मिळाली.

सचिन निकम यांनी स्पर्धेसाठी नाटक लिहिणं आणि ते स्वतः दिग्दर्शित करून सादर करण्याचं धाडस केलं. त्याच्याहीपेक्षा वीसहून अधिक शाळकरी, महाविद्यालयीन तरुणांची मोट बांधून त्यांनी स्पर्धेत प्रयोग सादर केला, हेही तितकेच महत्त्वाचे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, नाटकाचा आशय, फॉर्म आणि एकूणच सादरीकरण याबाबत प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा 
असू शकतो. 

अनेक प्रश्‍नांचा गुंता घेऊनच आपल्या भोवतालात माणसाचं जगणं सुरू आहे. कितीही प्रगती केली तरी जात-धर्म, गरीब-श्रीमंत असा भेदभाव अजूनही आहे आणि तो प्रत्येक गोष्टीत प्रकर्षानं जाणवतो. शिक्षणापासून राजकारणापर्यंत आणि चंगळवादापासून विज्ञानाच्या प्रगतीपर्यंत साऱ्या गोष्टींवर नाटकातून भाष्य होते. विविध प्रसंगांबरोबरच नृत्य-गीतांसह नाटकात कविताही येतात. एकूणच माणसाने स्वतः निर्माण केलेल्या विविध प्रश्‍नांतून वसुंधरेच्या अस्तित्वावरच आपण घाला घालणार आहोत, याची जाणीव असूनही माणूस का शहाणा होत नाही, असा सवालही ते वारंवार उपस्थित करतं.

पात्रपरिचय - 
श्रावणी शिंदे (नात), प्रज्ञा पाटील (सूत्रधार), सिद्घी मगदूम (आठ, सहा, तीन अकरा...), प्रदीप देसाई (शास्त्रज्ञ आजोबा), सागर मिसाळ (सूत्रधार, तीन, आठ...), शिवानी शिंदे (सात, दोन, बारा...), स्वराली कडू (सहा, पाच, बारा...), रोहन भोसले (नऊ, एक, सात...), अक्षय सुतार (एलियन, एक, सूत्रधार...), राकेश चव्हाण (सेल्समन, दोन, चार...), विठ्ठल कांबळे (अ, चार, नऊ...), परमेश्‍वर गंगावणे (पुढारी - एक, कविता...), ओंकार पाटील (रिपोर्टर, दहा, ती...), बयाजी करांडे (म्युझिक असिस्टंट, बॅक स्टेज), प्रफुल्ल पाटील (पूर्वज), कौशिक जाधव (पूर्वज), संग्राम पाटील (पीए- एक, चार, नऊ...)
 दिग्दर्शक- सचिन निकम
 नेपथ्य- चेतन शिंदे, विजय चोकाककर
 प्रकाश योजना- विनायक सुतार, विवेक देवस्थळी
 संगीत- अजिंक्‍य हावळ, प्रणव कुलकर्णी, चेतन शिंदे
 
 

Web Title: Kolhapur News State Drama Competition special