नेटका प्रयोग ‘द कॉन्शस’..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

इचलकरंजीच्या रंगयात्रा संस्थेने यंदाच्या स्पर्धेतही ‘द कॉन्शस’ या नाटकाचा नेटका प्रयोग सादर केला. मानवी मन आणि भावभावनांचा कल्लोळ हा नाटकाचा नेहमीच विषय राहिला आहे आणि अमेय दक्षिणदास यांनी लिहिलेलं हे नाटक अशाच अनुषंगानं बोलतं. 

इचलकरंजीच्या रंगयात्रा संस्थेने यंदाच्या स्पर्धेतही ‘द कॉन्शस’ या नाटकाचा नेटका प्रयोग सादर केला. मानवी मन आणि भावभावनांचा कल्लोळ हा नाटकाचा नेहमीच विषय राहिला आहे आणि अमेय दक्षिणदास यांनी लिहिलेलं हे नाटक अशाच अनुषंगानं बोलतं. 

ज्याची त्याची सद्‌सदविवेकबुद्धीच ज्याच्या त्याच्या चुकीची शिक्षा देते, असा संदेश देणारी ही रहस्यमय कथा. श्‍याम, मीरा आणि मनस्वी या तीनच व्यक्तिरेखांभोवती नाटक फिरतं. स्वतःला बुद्धिमान समजणारा श्‍याम अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही बायकोच्या चुका काढत असतो. मानसशास्त्राची पदव्युत्तर पदवी असणारी मीरा ही श्‍यामची बायको आणि तिचे श्‍यामवर अमाप प्रेम. म्हणूनच त्याच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ती जाणीवपूर्वक चुकीचं देत असते आणि श्‍याम तिला निर्बुद्ध ठरवीत असतो. पण, तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचा फोन येतो आणि नाटकातील रहस्यमयता 
आणखी वाढते. 

मनस्वीने एका आर्ट डीलरकडे ‘द कॉन्शस’ नावाचं चित्र विकायला ठेवलेलं असतं. त्याच्या आजोबांपासून ते चित्र त्यांच्याकडे असते. ते चित्र येते आणि सात दिवसांत आजोबांचा मृत्यू आणि वडील वेडे होतात. पण, श्‍यामने ते चित्र विकत घेतल्यावर तो त्याच्याकडे जातो आणि त्या चित्राचा भूतकाळ सांगतो. सात दिवसांत ते चित्र तुम्हाला तुमच्या भूतकाळात नेऊन अन्यायी व्यक्तीला .तुमच्यासमोर उभे करते आणि तुम्ही केलेल्या चुकीची शिक्षा तुम्हांला देते, असे तो सांगतो आणि नाटक पुढे सरकते. नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा आणि रंगभूषेसह पार्श्‍वसंगीतही नेटके. महादेव जाधव यांनी आपल्या टीमसह नाटक अगदी लीलया सादर केलं.   

पात्र परिचय 
 महादेव जाधव (श्‍याम), कादंबरी माळी (मीरा), अरुण दळवी (मनस्वी).

 दिग्दर्शक- महादेव जाधव
 प्रकाशयोजना- आशिष भागवत
 पार्श्‍वसंगीत- आशिष कुलकर्णी, सिद्धू लेंडे
 नेपथ्य- तुषार कुडाळकर, प्रवीण लायकर
 रंगमंच व्यवस्था- फिरोज खैरदी, मंजुनाथ कोरवी

Web Title: Kolhapur News State Drama Competition special