कोल्हापूर - एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत निगडेवाडी येथील सकल मराठा समाज आज दसरा चाैक येथे दाखल झाला. गेले काही दिवस मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी गावातील शेतकरी बैलगाडी व नांगर घेऊनच दसरा चौकात दाखल झाले.

आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अशी गर्जना करत त्यांनी ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
भगिनी मंचने चपाती-भाजी खाऊन शासनाचा निषेध केला, तर छत्रपती शिवाजी चौक रिक्षा मित्र मंडळाने शहर परिसरातून फेरी काढत आंदोलनाला पाठिंबा दिला. येवती, लोणार गल्ली व गवळ गल्ली, काळाईमाम तालमीने शासनावर कडाडून टीका केली.