बीड जिल्ह्यातील कानडीत शनिवारपासून शेतकरी संघटनेचे शिबिर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

सांगली - शेतकरी संघटनेने नवीन राजकीय पक्ष स्थापनेचे सूतोवाच केल्यानंतर कानडी (ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथे शनिवार (ता. 13) पासून तीन दिवस शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अशोक माने यांनी दिली. 

सांगली - शेतकरी संघटनेने नवीन राजकीय पक्ष स्थापनेचे सूतोवाच केल्यानंतर कानडी (ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथे शनिवार (ता. 13) पासून तीन दिवस शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अशोक माने यांनी दिली. 

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे सदस्य किशोर ढमाले, कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले, बाळासाहेब पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11 वाजता शिबीराचे उद्‌घाटन होईल. किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब (विचार कसा करावा?), मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. डी. ए. चव्हाण (शेती म्हणजे काय?), बाळासाहेब पठारे, सुभाष मायकर, संजय आपटे (शेतीमालाचा ऊत्पादन खर्च कसा काढावा? शेळीपालनाचा आणि दुधाचा ऊत्पादन खर्च) मार्गदर्शन आहे. 

रविवारी (ता. 14) रघुनाथदादा पाटील (शेतीसमोरील आव्हाने आणि आंदोलनाची दिशा), उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील विधिज्ञ ऍड. अजित काळे (दुपारी "शेतकऱ्यांचा गळफास ठरलेले कायदे), अजय तल्हार (महावितरणने वीजबील सक्तीने वसुल करणे योग्य आहे का?), एम. आय. टी. स्कूल ऑफ गव्हर्मेंट (पुणे) ची पदवी प्राप्त हनुमंत चाटे ("शासन व प्रशासनाचे काम कसे चालते?') मार्गदर्शन करतील. 

सोमवारी ( ता. 15) सकाळी 10 वाजता मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजय बुरांडे, वैद्यनाथ देवस्थान कमेटीचे सचिव राजेश देशमुख, राष्ट्रीय कॉंग्रेसचे बजरंग सोनवणे, कॉंग्रेसचे राजकिशोर मोदी, शिवसेनेचे वैजनाथ सोळंके, शेकापचे भाई मोहन गुंड, भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या सहभागाने "शेतकरी आत्महत्त्यांचा कलंक कसा पुसणार?' विषयावर परिसंवाद आहे. 

Web Title: Sangli News Farmers Association camp in Kandi