शिवप्रेमींच्या दुर्गामातेच्या दौडीला देशसेवेची साक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

बेळगाव - देव, देश अन्‌ धर्म रक्षणासाठी परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडीला बुधवारी (ता. २७) शिवतीर्थ येथून सुरवात झाली. संपूर्ण कॅम्प परिसरातून निघालेल्या दौडीमध्ये देशसेवेची साक्ष दिली. बेळगावच्या देदिप्यमान देशसेवेचा इतिहास स्मरण करणारी आजची दौड ठरली. मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या जवानांनी दौडीत भाग घेऊन शिवप्रेमींना प्रोत्साहन दिले. 

शिवतीर्थ येथे ऑनररी कॅप्टन सुभेदार मेजर घाग यांच्या हस्ते शिवपुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. यानंतर आरती, प्रेरणा मंत्राने दौडीची सुरवात झाली. काँग्रेस रोड, मराठा कॉलनी, नानावाडी, ग्लोब चित्रपटगृह रोड, इंडिपेन्डंट रोड, हायस्ट्रीट, चर्च स्ट्रीट, बेस्ट स्ट्रीट, कोंडाप्पा स्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंतीमाता मंदिर, फिश मार्केट, तेलगू कॉलनी, के. टी. पुजारी रोड, दुर्गामाता मंदिर, खानापूर रोड, धर्मवीर संभाजी चौक येथून जत्तीमठात आली. याठिकाणी शेखर हंडे यांच्या हस्ते दुर्गामातेची पूजा करून ध्येयमंत्राने दौडीची सांगता झाली. 

दौडीच्या प्रारंभी मराठा लाइट इन्फंट्रीच्या जवानांनी ध्वज घेऊन लष्करी गणवेशातच दौडीत सहभाग घेतला. काही अंतरापर्यंत दौडीत सहभाग घेतल्यानंतर युवकांकडे ध्वज सोपविण्यात आला. दुर्गामाता दौडीमध्ये चिरमुड्यांचीही संख्या वाढू लागली आहे. हायस्ट्रीट कॅम्प येथे लहान मुलांनी भारतमाता आणि लष्करी जवानाची केलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. 

Web Title: belgaum news Durga mata rally