पारंपरिक उत्साहात अंबाबाई- त्र्यंबोली देवीची भेट

Sakal | Monday, 25 September 2017

कोल्हापूर : "टेंबलाईच्या नावानं चांगभल... च्या गजरात आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत टेंबलाई टेकडीवर ललिता पंचमीचा सोहळा पारंपरिक उत्साहात झाला व्हिडिओ : नितीन जाधव

कोल्हापूर : "टेंबलाईच्या नावानं चांगभल... च्या गजरात आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत टेंबलाई टेकडीवर ललिता पंचमीचा सोहळा पारंपरिक उत्साहात झाला

व्हिडिओ : नितीन जाधव

 श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीनंतर कोहळा फोडण्याच्या पारंपरिक विधीवेळी तरुणांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांनी त्यांना लाठीचा प्रसाद दिला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, यानिमित्ताने दिवसभर त्र्यंबोली यात्रेला उधाण आले. रात्री उशिरापर्यंत भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती.