धक्कादायक ; देशाच अजूनही ५७ टक्क्यांहून अधिक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज नाहीत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

कोरोना माहामारीत सर्वांनाच स्वच्छता, आरोग्य, वैद्यकीय सुविधांचे महत्व आणि आवश्यकता याचा चांगलाच अनुभव आला.

कोल्हापूर : कोरोनामुळे जगाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. सामाजिक, आरोग्यसंस्था, खासगी तसेच शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या आपत्तीतून अनेकांना सुखरुप बाहेर काढले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे जीव त्यांनी वाचवले. यादरम्यान बऱ्याच ठिकाणी अनेकांना आर्थिक, आरोग्यविषयक आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे काही वेळा संकटांचा सामना करावा लागला. या काळात सरकार समोरही अनेक अडचणी उभ्या  होत्या. मनुष्यबळ कमी पडल्याने निवृत्त कर्मचारी, विविध संस्था - संघटनांना सकारने वैद्यकीय सेवा देण्याचे आवाहन केले. लोकांनी सरकारच्या अवाहनाला प्रतिसाद दिला. माणुसकीच्या प्रवृत्तीने सढळ हातांनी या संकटात मदत केली.

कोरोना माहामारीत सर्वांनाच स्वच्छता, आरोग्य, वैद्यकीय सुविधांचे महत्व आणि आवश्यकता याचा चांगलाच अनुभव आला. त्यामुळे यानंतर शासनाने वैदयकीय महाविद्यालये आणि रुग्णालये उभा करण्यावर भर दिला आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात आरोग्यविषयक पायाभूत सुविधांसाठी निधीही मंजूर केला आहे. कोरोनासारख्या आपत्तीला भविष्यातही सामोरे जाताना सगळ्यांची पूर्ताता करुन ठेवावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 

हेही वाचा -  परवानाधारक शस्त्रे जमा करावी लागणार ; पोलिसांकडून मोहीम सुरू

'द फॅकल्टी डॉट इन' च्या माहितीनुसार, आजच्या घडीला देशात 57 टक्क्यांहून अधिक जिल्हे असे आहेत, जिथे मेडिकल कॉलेज नाहीत. यामध्ये पुर्वोत्तर राज्यांत सर्वात कमी वैद्यकिय महाविद्यालये आहेत. तसेच दक्षिण भारतात मेडिकल कॉलेजचे प्रमाण जास्त आहे. केरळ कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात 25 टक्के जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज नाहीत. तर तामिळनाडू, महाराष्ट्रात 25 ते 50 टक्के जिल्हे असे आहेत जिथं ही कॉलेज नाहीत. मात्र उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यांमध्ये मेडिकल कॉलेजची संख्या जास्त आहे.

देशात राज्याच्या अनुषंगाने पाहिले तर 479 मेडिकल कॉलेज आहेत. त्यामध्ये 227 ही शासकीय आणि 252 ही खासगी मेडिकल कॉलेज आहेत. देशातील एकूण मेडिकल कॉलेजेसपैकी पूर्व भारतात 10 पेक्षा कमी, तर उत्तर भारतातील राज्यांमध्ये कॉलेजेसची संख्या ही 10 ते 20 इतकी आहे. यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश  या राज्यांचा समावेश आहे. दक्षिण भारतात आरोग्य सुविधांच्या बाबतीत सर्वाधिक जागरुकता दिसून येते. इतर राज्यांच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यांमध्ये 40 पेक्षा जास्त कॉलेज आहेत. देशात वैद्यकीय महाविद्यालयात एक लाख लोकसंख्येमागे 6 जागा आरक्षित असतात. देशाच्या संपूर्ण राखीव जागांमधून प्रत्येक राज्यासाठी 15 टक्के जागा आरक्षित असतात.

हेही वाचा - राष्ट्रवादीत उमेदवारी आदलाबदल; पक्षाच्या मजबूतीसाठी माघार घेतली

देशातल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रत्येक लाख लोकसंख्येमागे 6 मेडिकल जागा असतात. विद्यापीठ आयोगाने याची विभागणी केली असून प्रत्येक राज्यात ऑल इंडिया कोटा 15 टक्के आणि उर्वरीत जागा राज्यांसाठी राखीव असतात. कर्नाटक, केरळमध्ये मेडिकलमध्ये सीटचे प्रमाण सर्वाधिक असून राज्यात लाखांमागे 10 पेक्षा जास्त सीट आहेत. याशिवाय महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरातमध्ये हेच प्रमाण 6 ते 10 च्या दरम्यान आहे. मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानमध्ये 3 ते 6 इतकं आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: medical college information of india comparatively study of health provision