वीज कार्यालयाला मेणबत्यांचे तोरण

 Artillery candles to the electricity office
Artillery candles to the electricity office

कोल्हापूर : प्रस्तावित वीज दरवाढ त्वरित रद्द करावी, या प्रमुख व अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जनशक्तीतर्फे महावितरणच्या सावित्रीबाई फुले येथील वीज कार्यालयावर आज निदर्शने केली. यावेळी कार्यालयाच्या प्रवेशव्दाराला मेणबत्त्यांचे तोरण बांधले. दरवाढीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. 

स्थिर आकार 50 टक्‍क्‍यांनी कमी करावेत, वीज नियामक आयोगाची सुनावणी प्रत्येक जिल्ह्यात द्यावी, पन्नास युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना इतर सर्व आकारातून सवलत द्यावी, 30 युनिटपर्यंत वापर असणाऱ्या वाणिज्य ग्राहकांची घरगुती दराने आकारणी करावी, वीज शुल्काच्या नावाने सुरू असणारी सावकारी व्याज पद्धत बदलावी, कंपनीच्या खर्चाचा बोजा ग्राहकांवर न लादता आस्थापना खर्चात कपात करावी, या मागण्यांसाठी जनशक्तीचे कार्यकर्ते एकत्र आले. 

वीज कंपनीने विजेच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. जिल्ह्यात वीज चोरी व गळतीचे प्रमाण कमी असून वीज बिलांची वसुली चांगली आहे. असे असताना ग्राहकांकडून जिझिया कराची आकारणी चुकीची असल्याचे कार्यकर्त्यांनी अतिरिक्त अधीक्षक अभियंता श्री. अस्वले यांना सांगितले. मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. समीर नदाफ, अनिष पोतदार, अरुण असणे, राजन पाटील, दिलीप पाटील, ईश्‍वर तिवारी, विश्वास नाईक, अजित जरग, राजू थोरवडे, दीपक खांडेकर, बाळासाहेब शारबिद्रे, प्रशांत बोडके, अभिजीत सूर्यवंशी यांचा समावेश होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com