Republic Day 2020 : दर सव्वीस जानेवारीला येथे लागतात जिलेबीचे स्टॉल....

Kolhapur Republic Day Jilbei Special Day Kolhapur Marathi News
Kolhapur Republic Day Jilbei Special Day Kolhapur Marathi News

कोल्हापूर : चरचरीत मिस्सळ, तांबडा पांढरा रस्सा या खाद्य पदार्थाने प्रसिद्ध असलेल्या नगरीला जिलेबीची १०० वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा आहे. कुस्तीमध्ये विजयी झालेल्या मल्लांना जिलेबी देवून त्यांचे तोंड गोड करण्याच्या परंपरेने प्रजासत्ताक आणि स्वातंत्र दिनाच्या दिवसी जिलेबी खाण्याची अनोखी परंपरा जपली आहे. केवळ कोल्हापूर नव्हे जिल्ह्यातील ग्रामीण भागाने हि अनोखी परंपरा जोपासली आहे.

खरंतर, कोल्हापूर म्हटले, की आठवते तो तांबडा आणि पांढरा. परंतु आठवडय़ातून एकदा तरी यावर ताव मारणा-या कोल्हापुरातच स्वातंत्र्यदिन असो, की प्रजासत्ताक दिन, जिलेबी खाण्याचीही एक आगळीवेगळी परंपरा जपलेली आहे.
 पावशेर का होईना, जिलेबी घरात येतेच येते. मग तो कितीही गरीब असो, वा श्रीमंत. या आनंदाच्या प्रसंगी जिलेबी आवर्जून आणलीच जाते आणि आवडीने खाल्लीही जाते.


जिलेबीचा इतिहास
 कोल्हापुरात सुमारे १०० वर्षापूर्वी जिलेबी आली असल्याच्या नोंदी सापडतात . कुस्तीशौकिन रामचंद्र बाबाजी माळकर यांनी सर्वप्रथम मल्लांनी कुस्ती मारली की त्यांचे तोंड गोड करण्यासाठी जिलेबी वाटण्याची प्रथा सुरु केली, ती आजही कायम आहे. आज त्यांची चौथी पिढी म्हणजे अजिंक्य महादेव माळकर. माळकरांची पाच भावंडेही याच व्यवसायात आहेत. माळकरांचे दुकान आज ज्या महानगरपालिकेच्या इमारतीच्या चौकात आहे, त्यालाच माळकर तिकटी असे नाव आहे. महानगरपालिकेची इमारत नव्हती, त्या आधीपासून माळकरांचा वाडा आणि दुकान या परिसरात आहे. 

शाहू महाराजांच्या नंतर राजाराम महाराजांर्पयत शाही कार्यक्रमात, कुस्तीगीरांना वाटण्यासाठी, सणासुदीला जिलेबी वाटण्याची प्रथा कायम होती. शाहू महाराजांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी कोल्हापुरात जिलेबी वाटल्याचा संदर्भ सापडतो आहे. त्यामुळे कोल्हापुरातील जिलेबीचा इतिहास हा तसा जुना आहे. राजाराम महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळय़ातही माळकरांकडून आणलेली जिलेबी वाटण्यात आल्याचे संदर्भ सापडले आहेत. 

राजघराण्यालाही आकर्षण

राजघराण्यातही माळकर यांच्याकडून किती शेर जिलेबी आणली, याचे कागद सापडले आहेत. राजघराण्यातही महाराजांकडे रोज हजारभर रयत भोजनासाठी पंगतीला असे. त्यांच्यासाठी विविध खाद्यपदार्थ तयार केले जाते. शाहू महाराज मात्र, पंगतीला बसताना आपल्या सवंगडय़ाच्या हातातले पिठलेभाकर खात, अन त्यांच्यासाठी तयार केलेले जेवण पंगतीने इतरांना वाढले जात.

समारंभात मात्र पंचपक्वाने बनत असत. त्यासाठी सोवळेकरी असंत. माळकरांचे जिलेबीसाठी प्रसिध्द.करवीरनगरी कुस्तीसाठी प्रसिध्द. त्यामुळे देशविदेशातील मल्ल येथे येत. शिवाजी पुतळय़ाजवळील चौक हा रहदारीचा. आजही आहे. तेथे गर्दी असायची. त्यामुळे पहिलवानांसाठी तेव्हा तुपातील जिलेबी. सादीक पंजाबी आणि गामा पंजाबी या पाकिस्तानी मल्लातील कुस्तीवेळी त्यांनी रामचंद्र बाबाजी माळकर हॉटेलमध्ये जिलेबी खाल्या होत्या.

कोल्हापुरात शेकडो स्टॉल
कोल्हापुरात प्रत्येक घरात जिलेबी खालीच जाते. त्यासाठी गल्ली बोलापासून ते मुख्य रस्त्यावर शेकडो स्टोल राहतात काही मंडळेही जिलेबी तयार करतात. या ठिकाणीही मोठी उलाढाल होते. तर आसपासच्या गावात देखिल जिलेबी कोल्हापुरातून खरेदी केली जाते. कोल्हापूर ,इचलकरंजी ,सांगली ,मिरज,जयसिंगपूर आदी ठिकाणी स्टॉल लावले जातात. 

 अशी बनते जिलेबी..

पूर्वी केवळ रिफाईन्ड तेलातील जिलेबी उपलब्ध होती. आता काळ बदललाय. वनस्पती आणि साजुक तुपातील जिलेबींना ग्राहक पसंती देत आहेत. असे असले तरी अजूनही रिफाईन्ड तेलातील जिलेबीला मोठी मागणी आहे. जिलेबीमध्ये पनीर जिलेबी, इमरती, डॉलर जिलेबी, केशर, दूध, वेलची जिलेबी व रसभर जिलेबी, मावा जिलेबी असे काही प्रकार आहेत. जिलेबी किंवा पाक तयार करताना लाकडाचा वापर केला तर त्याचा स्वाद अधिक खुलतो. शुगर फ्री जिलेबीही मधुमेहींच्या रुग्णांसाठी मिळते. मात्र, त्यासाठी ऑर्डर द्यावी लागते. ही जिलेबी साखरेच्या पाकात न टाकता ती शुगर फ्री सिरपमध्ये टाकली जाते. 

खंबीर लावणं 

जिलेबीचे पीठ साधारण एक आठवडा आधी भिजवले जाते. कोमट पाणी आणि उच्च प्रतीचा मैदा असं एकत्न करून दह्याच्या मुरवणाप्रमाणो हे मित्नण भिजवून ठेवावे लागते. याला खंबीर लावणं असं म्हणतात. खंबीर उठणं आणि खंबीर बसणं यावर जिलेबीची चव आणि आकार अवलंबून असतो. खंबीर नीट जमलं नाही तर जिलेबी कडे धरत नाही किंवा साखरेचे पाणी शोषून घेत नाही.

जिलेबी करताना 85 टक्के खंबीर आणि 15 टक्के मैदा एकत्र  केले जाते. या मिश्रणाला पाणी न लागण्याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी डोळय़ात अक्षरश: तेल घालून बसावं लागतं. जिलेबीचं पीठ जेवढं मुरतं तितकी छान चव जिलेबीला येते.जिलेबी तळण्यासाठी पूर्वी पंढरपूरहून जिलेबीवाले येत. एकावेळी ते तीसभर जिलेबी गोलाकार तळत असतात. अलिकडे या पंढरपूरच्या कारागीरांची संख्या रोडावली असली तरी स्थानिक कामगार मात्र तयार झालेले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com