‘गोकुळ’ बाबत तासभर खलबते ; मुश्रीफ, पी. एन., सतेज पाटील यांच्यात मुंबईत चर्चा

 election of District Milk Producers Association Gokul  Minister Hasan Mushrif Satej Patil  MLA P. N. In Mumbai metting political news marathi
 election of District Milk Producers Association Gokul  Minister Hasan Mushrif Satej Patil  MLA P. N. In Mumbai metting political news marathi

कोल्हापूर : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसंदर्भात  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, ‘गोकुळ’चे नेते आमदार पी. एन. पाटील यांच्यात मुंबईत खलबते झाली. सुमारे तासभर चर्चा झाली; पण त्यात ठोस निर्णय झाला नाही. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा चर्चा करण्याचे ठरले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात आल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोकुळ निवडणूक प्रक्रिया मात्र सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पी. एन., मुश्रीफ यांच्या भेटीवेळी ‘गोकुळ’ने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णयानंतर चर्चा करण्याचे ठरले होते. त्यानुसार आज मुंबईत या दोघांसह पालकमंत्री पाटील यांच्यात चर्चा झाली. जिल्हा बॅंक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध व्हावी, यासाठी मुश्रीफ प्रयत्नशील आहेत. 

यात त्यांना ‘गोकुळ’च्या सत्तारूढ गटाचे नेते पी. एन. व महादेवराव महाडिक यांचे सहकार्य आवश्‍यक आहे. त्याच पद्धतीने ‘गोकुळ’मध्ये सत्ताधाऱ्यांना मुश्रीफ आपल्यासोबत राहिले, तर केडीसीत सहकार्य करू, अशी तोडजोडीची भूमिका आहे. याच वेळी  महाडिक यांचा अडथळा आहे.  मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांना महाडिक नको आहेत. तर पी. एन. यांना महाडिक यांची साथ हवी आहे. ‘गोकुळ’मध्ये तडजोड करताना हाच कळीचा मुद्दा ठरतो आहे. त्यामुळे या तिघांमध्ये तासभर चर्चा होऊनही ठोस निर्णय झाला नाही. 


‘गोकुळ’विरोधात मुश्रीफ यांच्या तुलनेत पालकमंत्री पाटील आघाडीवर आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सोडविताना  महाडिक यांच्या वाट्याला जागा किती, हा वादाचा विषय होऊ शकतो.  महाडिक यांना मानणारे एक-दोन संचालक असतील. सतेज पाटील यांनी यावर आक्षेप घेऊ नये, अशी भूमिका  मुश्रीफ यांनी या बैठकीत मांडल्याचे समजते. गत गोकुळ निवडणुकीत मुश्रीफ सत्ताधाऱ्यांसोबत होते. त्यानंतर त्यांना पाच वर्षांत बेदखल केले, ही वस्तुस्थिती होती. तरी जिल्हा बॅंकेसाठी मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होताच त्यावर पुन्हा एकत्र बैठक घेण्याचे ठरले. 
 
तिढा सुटणे अवघड
गोकुळ राजकारणात गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे एक-दोन जागा घेऊन ते तडजोड स्वीकारण्याची शक्‍यता नाही.  मुश्रीफ हे काय भूमिका घेतात, यावर बऱ्याच घडामोडी अवलंबून आहेत. त्यामुळे ‘गोकुळ’चा तिढा लगेच सुटणे अशक्‍य आहे.

त्यामुळेच सतेज पाटील चर्चेत
‘गोकुळ’च्या लढाईत मुश्रीफ यांना सोबत घेतल्याशिवाय कोणाची एकहाती सत्ता येणार नाही, हे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या पाठिंब्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत; परंतु मुश्रीफ यांनी जिल्हा बॅंक समोर ठेवून चर्चा सुरू ठेवली आहे. त्यामुळे पी. एन. पाटील यांच्यासोबत सतेज पाटील यांनाही चर्चेत घेतले आहे, असे कळते. तथापि सतेज पाटील हे या चर्चेला किती महत्त्व देतात, यावरच बरेच काही अवलंबून आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com