आजरावासीयांच्या उरात भरतेय धडकी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

गेले तीन दिवस तालुक्‍यांत एकही बाधित नव्हता. आज भादवण, जाधेवाडी, बेलेवाडी हू मध्ये तीन जण कोरोना बाधित आढळले. यामध्ये एक पुरुष, महिला व बालकाचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्‍यात बाधितांची संख्या 35 वर पोहचली आहे.

आजरा (कोल्हापूर)  ः गेले तीन दिवस तालुक्‍यांत एकही बाधित नव्हता. आज भादवण, जाधेवाडी, बेलेवाडी हू मध्ये तीन जण कोरोना बाधित आढळले. यामध्ये एक पुरुष, महिला व बालकाचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्‍यात बाधितांची संख्या 35 वर पोहचली आहे.

तालुक्‍यात सोमवार (ता. 25) 12 गावांतील 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. सर्वच गावे सील केली. त्यानंतर सलग तीन दिवस तालुक्‍यात अनेक जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आज दुपारी तीन जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. बेलेवाडी हुबळगी येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचे कुटुंबीय शुक्रवार (ता. 15) गावी आले होते. त्यांचे पती व मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे एकाच कुटुंबातील महिलेसह पाच जण बाधित झाले आहेत. या गावात बाधितांची संख्या 5 वर पोहचली आहे. जाधेवाडी येथील एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो मंगळवार (ता. 19) मुंबईहून गावी आला होता. भादवण येथील तरुण हा पत्नी, बालकासह मंगळवार (ता.12) मुंबईहून गावी आले होते. यातील पती पत्नींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज त्यांच्या बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण आजऱ्यातील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाने आज जाधेवाडी गावात जाऊन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ājārāvāsīyān̄cyā urāta bharatēya dhaḍak