Good News : केंद्रांवर लसीकरण होणार सुरळीत; कोल्हापुरला एक लाख लशींचा पुरवठा

1 lakh vaccination provided by kolhapur district level for people
1 lakh vaccination provided by kolhapur district level for people

कोल्हापूर : जिल्ह्यात जवळपास एक लाख कोरोना प्रतिबंधक लशी पुणे आरोग्य विभागाकडून दाखल झाल्या आहेत. त्याचे वाटप सुरू झाले असून, उद्या (११) दुपारनंतर शहरातील तसेच ग्रामीण भागातील निवडक केंद्रांवर लसीकरण सुरू होईल, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारुक देसाई यांनी दिली.

कोरोना लसीकरणाचा जवळपास पाच लाखांचा टप्पा पूर्ण झाला, त्यानंतर काल (९)पासून ग्रामीण भागातील १८० हून अधिक वैद्यकीय उपकेंद्रांवरील लशी संपल्या होत्या. तत्पूर्वी, गेल्या आठवड्यात दोन लाख ८० हजार नवीन कोव्हॅक्‍सिनची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळी एक लाख लशी कोल्हापुरात आल्या आहेत. त्याचे वाटपही सुरू करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय तसेच आरोग्य केंद्रांना आज लशी पाठविण्यात आल्या. तूर्त उपकेंद्रांवर मात्र लशी पाठविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे.जिल्ह्यात १६ लाख व्यक्तींना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. 

शहरात १२ हजार लशींचे वाटप 

महापालिका रुग्णालयात १२ हजार लशी आल्या. शहरातील ११ केंद्रांवर लशी पाठविण्यात आल्या. एक हजार ९७६ व्यक्तींनी आज लशी घेतल्या. ३२ केंद्रे शहरात आहेत. यातील ११ महापालिकेची, तर उर्वरित केंद्रे खासगी रुग्णालयांत आहेत. आजवर ७७ हजार ८७३ व्यक्तींनी पहिली लस घेतली; तर दुसरी लस आठ हजार ८२१ व्यक्तींनी घेतली आहे.

इचलकरंजीत सहा हजार लशी

इचलकरंजी : शहरात जिल्हा प्रशासनाकडून सहा हजार लसी पुरविण्यात आल्या आहेत. उद्यापासून सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे व नवीन सहा अशा १२ लसीकरण केंद्रांवर लशी दिल्या जाणार आहेत. आरोग्य सभापती संजय केंगार यांनी ही माहिती दिली. दोन दिवसांपासून कोविड प्रतिबंधक लशींचा तुटवडा होता. सभापती केंगार यांनी पाठपुरावा केल्याने जिल्हा प्रशासनाकडून आज इचलकरंजीसाठी सहा हजार लशींचा पुरवठा करण्यात आला. उद्या सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत लशी दिल्या जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com