पंचवीस लाखात धावतील 10 रोडरोलर 

10 road rollers will run at 25 lakhs
10 road rollers will run at 25 lakhs

कोल्हापूर : महापालिकेच्या वर्कशॉप विभागातील जुन्या वाहनांचे पुर्नजीवन करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची भेट महत्वाची ठरणार आहे. वर्कशॉपमध्ये दहा रोडरोलर असून या दहाही रोडरोलरच्या दुरुस्तीवर 25 लाख रुपये खर्च केले तर दहाही रोडरोलर सुरु राहणार आहे. बाजारात नवा रोडरोलर घ्यायचा झाला तर एकाचा 25 ते 30 लाख खर्च येणार आहे. पण एवढ्याच पैशात महापालिकेचे 10 रोलर दुरुस्त होउन रस्त्यावर धावणार असून लोकसुविधेसाठी ते उपलब्ध होणार आहेत.

वापरात नसलेली वाहने वापरात आणणण्यासाठी आता पदाधिकारी,अधिकाऱ्यांनी लक्ष घालून येथेही निधी उपलब्ध करुन दिला तर लोकसेवेसाठी जादा क्षमतेने वाहने उपलब्ध होणार आहेत. 
महापालिकेचा वर्कशॉप विभाग म्हणजे महापालिकेचे नाक आहे. या विभागात महापालिकेची सगळी वाहने आहेत. रोडरोलर, जेसीबी, डंपर, कचरा उठावाच्या आरसी गाड्यासह, महापालिका अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वाहनाचीही देखभाल आणि दुरुस्ती येथे केली जाते. वर्कशॉपमध्ये सुमारे दीडशे ते दोनशे वाहने आहेत. पण ही सर्व वाहने दुरुस्त करण्यासाठी लागणारा निधी या विभागाकडे उपलब्ध नाही. तसेच कुशल तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचाही अभाव आहे. सध्या या विभागाकडे जे तंत्रज्ञ आहेत. त्यांनी कशीबशी या विभागाला संजीवनी देण्याच प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नावर खूपच मर्यादा आहेत. 

स्पेअर्स पार्ट काढण्यासाठीच जुनी वाहने 
महापालिकेच्या वर्कशॉपमध्ये जुनी बंद स्थितीत असलेल्या वाहनांचे एकेक पार्ट काढून ते निकामी केले जातात. दुसऱ्या कोणत्या वाहनाचा स्पेअर पार्ट गेला की, बंद स्थितीतील गाडीचा स्पेअर्स पार्ट काढ आणि घाल दुसऱ्या गाडीला, अशी येथे अवस्था आहे. पण नवे स्पेअर्स पार्ट खरेदीकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.परिणामी बंद पडलेली वाहने पुरती निकामीच करण्याचे काम केले जाते. 

अधिकारी,पदाधिकाऱ्यांची वाहनावर खर्च 
महापालिकेत नवे अधिकारी आले अथवा पदाधिकारी आले की,त्यांच्यासाठी नव्या गाड्या घेतल्या जातात. त्या गाड्यासाठी महापालिकेकडे निधी असतो,पण लोकसुविधेसाठी लागणाऱ्या वाहनांना निधी का मिळत नाही? असाही एक प्रश्‍न आहे. लोकसुविधेसाठी लागणारे जेसीबी, रोडरोलर, डंपर,पाण्याचे टॅंकर याची मुबलक उपलब्धता महापालिकेच्या वर्कशॉपकडे असणे गरजेचे आहे. 

दररोज तपासणी हवी 
महापालिकेच्या ताफ्यातील सर्व वाहनांची तपासणी रोज केली जाणे गरजेचे आहे. कांही वाहनावर किरकोळ खर्च केला तर ती सुस्थितीत राहू शकतात.पण दुर्लक्षामुळे हा खर्च वाढतो आणि वाहने निकामी होण्याचे प्रकार वाढतात. त्यामुळे वर्कशॉपकडे लक्ष द्यायला हवे.तसेच चांगल्या कुशल तंत्रज्ञानाचीही येथे आवश्‍यकता आहे. 

वरिष्ट अधिकाऱ्यांचे लक्ष हवे 
महापालिकेते येणारे वरिष्ट अधिकारी मलईदारी खाती आपल्याकडे असावीत, यासाठी प्रयत्नशील असतात. प्रत्येक अधिकाऱ्याचा डोळा नगररचना आणि पाणीपुरवठा विभागावर असतो, पण वर्कशॉप म्हणजे अधिकाऱ्यांना कटकट वाटते. जबाबदारीचे काम घेणाऱ्या वरिष्ट अधिकाऱ्याचीही महापालिकेला वाणवा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com