कोल्हापूर शहरातील हा भाग बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट ; आज सापडले तब्बल एवढे रूग्ण 

179 new corona positive patient in kolhapur city
179 new corona positive patient in kolhapur city

कोल्हापूर - शहराज आज 179 कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली. राजारामपुरी परिसरात पुन्हा एकदा 27 रुग्ण नव्याने आढळले. मंगळवार पेठ परिसरात 10, शिवाजी पार्क येथे 9, शिवाजी पेठेत 13, कसबा बावडा तसेच जवाहरनगर येथे प्रत्येकी सहा, कदमवाडी, शुक्रवार पेठेत प्रत्येकी पाच, रविवार पेठेत 6, राजेंद्रनगर, देवकर पाणंद, जरगनगर, गंगावेस येथे प्रत्येकी चार रुग्ण आढळले, लक्षतीर्थ, रमणमळा, शिवाजी चौक, सुभाषनगर, विचारेमाळ, बापूरामनगर, अंबाई टॅक, येथे प्रत्येकी तीन रुग्ण आढळले. 

राजारामपुरीत सर्वाधिक 311,कसबा बावडा येथे 185, मंगळवार पेठेत 174, शिवाजी पेठेत 172, संभाजीनगर येथे आजअखेर 100 रुग्ण आढळून आले आहेत. 

राजारामपुरीने आज तीनशेंचा टप्पा पूर्ण केला. परिसरातील गर्दी हाच चितेंचा विषय ठरला आहे. शहरात दररोज किमान दीडशे रुग्णांची भर पडत आहेत. बहुतांशी रुग्ण हे अन्य रुग्णाच्या संपर्कातील आहेत. महापालिकेचे कोव्हिड सेंटर तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात 3219 आजअखेर रूग्ण आढळले आहेत. 71 जणांचा मूृत्यू झाला आहे. शहराच्या विविध भागात 87 प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. राजारामपुरी, कसबा बावडा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ,संभाजीनगर, जवाहरनगर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. 

शहरात तीन हजारांचा टप्पा ओलांडला तरी त्यातील अठराशे जण सध्या ऍक्‍टीव्ह रुग्ण आहेत. तर बाराशे जणांचा डिस्चार्ज झाला आहे. 


बावड्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू 
 कोरोनामुळे कसबा बावडा परिसरातील तिघांचा आज एकाच दिवसांत मृत्यु झाला. आतापर्यंत बावड्यात कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रूग्णांची संख्या 13 झाली आहे. आज मृत्यु झालेल्या रूग्णात बावड्यातील कोरोना बाधित डॉक्‍टरांच्या वडीलांचा समावेश आहे. अन्य दोन मृत्युपैकी एकजण चव्हाण गल्लीतील तर एक जण गोळीबार मैदान परिसरातील आहे. चव्हाण गल्लीतील वृध्दांचा मृत्युपुर्वी स्वॅब घेतला होता. बाधित डॉक्‍टरांच्या वडीलांवर गेल्या पंधरा दिवसांपासून शिवाजी पार्कातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यु झाला. आज कसबा बावडा परिसरात कोरोनाबाधित सहा नवे रूग्ण आढळून आले. आतापर्यंत बावड्यात 185 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com