दोन हजारच्या आमिषापोटी घालविले 28 हजार रुपये 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

आमिष दाखवून युवतीच्या बॅंक खात्यातून 28 हजार 475 रुपय रोकड हडपल्याची घटना घडली

गडहिंग्लज : फोन पे कंपनीकडून दोन हजार रुपयाचे कॅशबॅक मिळाल्याचे आमिष दाखवून युवतीच्या बॅंक खात्यातून 28 हजार 475 रुपय रोकड हडपल्याची घटना घडली. याप्रकरणी अमितकुमार साहू याच्याविरूद्ध आज येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी सांगितले, 12 ऑक्‍टोबरला दुपारी येथील कडगाव रोडवरील हिमाद्री शिंदे यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन पे कंपनीतून बोलत असल्याचे सांगून साहूने कंपनीकडून तुम्हाला 2000 रुपयांचे कॅशबॅक दिले असून ते आपण घेतले नसल्याचे सांगितले. कॅशबॅकची ही रक्कम घेण्यासाठी मोबाईलवर फोन पे ऍप उघडून त्यावर कोड नंबर सेव्ह करण्यास सांगितला. हिमाद्रीने हा कोड नंबर सेव्ह केल्यानंतर तिच्या बॅंक ऑफ इंडियाच्या गडहिंग्लज शाखेतील बॅंक खात्यावरून दोनवेळा प्रत्येकी 9 हजार 988 आणि एकदा 8 हजार 499 रुपये असे एकूण 28 हजार 475 रुपये साहू याने ऑनलाईनद्वारे काढून घेतले. फसवूणक झाल्याचे लक्षात येताच हिमाद्री हिने आज पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहूविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 000 spent on the lure of two thousand