तिलारी घाटात तीन लाखांचा मद्यसाठा जप्त ; दोघांवर गुन्हा दाखल

3 lakh rupees illegal alcohol found in tilari ghat section two people are arrested by police in kolhapur
3 lakh rupees illegal alcohol found in tilari ghat section two people are arrested by police in kolhapur

कोल्हापूर : चंदगड तिलारी घाट परिसरातून मद्याची चोरी वाहतूक करणारी मोटार राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून पकडला. त्यातील तीन लाखांहून अधिकचा मद्यसाठासह मोटार जप्त केली. याप्रकरणी चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नांवे दिवाकर लाडू गवस (वय 39, रा. साटेली, भेडशी, जळकाटवाडी, दोडामार्ग) व शिवाजी गावडे (रा. पोर्ले) अशी आहेत.

याबाबत विभागाने दिलेली माहिती, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला चंदगड तालुक्‍यातील तिलारी घाट मार्गे गोवा बनावटीचा मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचला. दरम्यान या रस्त्यावरून एक मोटार तिलारी मार्गे येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने हे वाहन थांबवले. त्यानंतर मोटारीची झडती घेतली. त्यात तीन लाख 9 हजार रूपये किमंतीचे मद्याचे 63 बॉक्‍स पथकाला मिळाले. 

चालकाने त्याचे नाव दिवाकर गवस असल्याचे सांगितले. त्याला पथकाने ताब्यात घेऊन मद्याचा साठा नेमका कोणाचा याची माहिती घेतली. त्यात हा साठा पोर्ले येथील संशयित शिवाजी गावडेचा असल्याचे पुढे आले. पथकाने या दोघांवर गुन्हा दाखल करून मद्य व मोटारीसह 4 लाख 42 हजार 600 रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मिलींद गरूड, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, अजय वाघमारे, कर्मचारी संदीप जानकर, सचिन काळेल, सागर शिंदे, मारुती पोवार, जय शिनगारे, राजेंद्र कोळी यांनी केली. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com