
मार्केट यार्ड परिसरातील दुसरा प्रकार
कोल्हापूर : मार्केट यार्ड परिसरातील गुदामातून चोरट्याने पुन्हा सुमारे 35 हजार रुपये किमंतीचा कांदा बटाटा लंपास केला. चौवीस तासातील हा दुसरा प्रकाराने व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती
मार्केट यार्ड परिसरातील व्यापारी प्रकाश उमराणी यांच्या गोदामाचा पत्रा उचकटून चोरट्याने आत प्रवेश करून सुमारे 65 हजाराचा कांदा बटाटा, लसूनची पोती लंपास केली होती. हा प्रकार सीसी टीव्हीत कैद झाला. याची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली.
हेही वाचा- गेटवरील जवानांनी विचारले कशासाठी आलात ; भरतीसाठी आलो अस म्हणत युवकांना झाला मनस्ताप -
प्राप्त फुटेजद्वारे पोलिसांनी चोरीचा तपास सुरू केला. दरम्यान चौवीस तासाच्या आत याच परिसरातील गोदामातून चोरट्याने गोदामातील सुमारे 35 हजाराचा कांदा बटाटा लंपास करून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
संपादन - अर्चना बनगे