esakal | कोल्हापूर : पाडळी खुर्द येथे 40 एकरातील ऊस जळून खाक

बोलून बातमी शोधा

40 acres of sugarcane burnt kolhapur padali khurd}

आगीचे कारण समजू शकले नाही. या आगीत बांधावरची अनेक झाडे जळून खाक झाली आहेत

कोल्हापूर : पाडळी खुर्द येथे 40 एकरातील ऊस जळून खाक
sakal_logo
By
कुंडलिक पाटील

कुडित्रे - पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे उसाच्या फडाला आग लागल्याने सुमारे 40 एकरातील ऊस जळाला. यामुळे सुमारे 28 शेतकऱ्यांचे सव्वा दहा लाखाचे नुकसान झाले. दरम्यान आगीचे कारण समजू शकले नाही. या आगीत बांधावरची अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. यामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे.  

घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाडळी खुर्द गावाला सुमारे 750 हेक्टर शेतजमीन आहे. बहुतांश शेतकरी ऊस पीक घेतात. येथील ऊस कुंभी, भोगावती,डॉ. डी.वाय,दालमिया,व इतर साखर कारखान्यांना ऊस पाठविला जातो. यावर्षी ऊसतोड मजूर टंचाई असल्याने आतापर्यंत फक्त तीस टक्के उसाची तोड झाली होती.

आज सकाळी सुमारे 11 वाजता नदी काठ परिसरात उसाच्या फडाला अचानक आग लागली. गेल्या आठवड्यापासून उन्हाचे प्रमाण ही वाढले आहे. यामुळे आगीने भडका घेतला. आग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली की बघता बघता सुमारे 30 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. यावेळी काही शेतकऱ्यांनी नदी काठावरील शेती पंप सुरू करून पाणी मारण्याचा प्रयत्न केला. काही शेतकऱ्यांनी ऊस तोडून भांगा मारला. यामुळे काही प्रमाणात आग आटोक्यात आली. ऊस तोडणी मजुराचा प्रश्न असताना आगीत जळालेला ऊस तोडणी करण्याचे आवाहन आता शेतकऱ्यांच्या समोर उभे राहिली आहे.

या आगीत नदी काठावरील आणि बांधावरील अनेक झाडे झुडपे जळून खाक झाली. यामुळे पर्यावरणाची हानी झाली. सरपंच तानाजी पालकर, सदस्य प्रकाश पाटील, वैभव पाटील, नानासो पाटील तलाठी जी.एम. शिंदे, पोलिस पाटील सुरेश पाटील, कोतवाल संदीप पाटील, सदस्य, यांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

नामदेव पाटील, शिवाजी पाटील, तुकाराम पाटील, वैभव पाटील,ज्ञानू कळके, धनाजी पाटील, भीमराव पाटील, नामदेव पाटील, दत्ता पाटील, तुकाराम पाटील ,बाबुराव पाटील, वसंत पाटील,आनंद पाटील, मारुती पाटील, उत्तम पाटील ,रमेश पाटील, हरी पाटील ,बळवंत पाटील, अशोक पाटील, धनाजी पाटील, दिलीप पाटील, श्रीकांत पाटील पांडुरंग पाटील आनंदा पाटील या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे