65 वर्षांपूर्वी अंबाबाईच्या महाप्रसादासाठी सात तास भाविकांची रीघ, यंदा कोरोनामुळे महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे प्रसाद घरपोच

 65 years ago, a seven-hour procession of devotees for Mahaprasada
65 years ago, a seven-hour procession of devotees for Mahaprasada

कोल्हापूर,ः बावीस पोती तांदूळ, सहा मण गहू, अठरा गूळ रवे, दोन मण डाळ, एकशे पाच नारळ आणि मोठ्या प्रमाणावर आलेल्या पालेभाज्या...ही यादी आहे, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात 1955 साली झालेल्या महाप्रसादाच्या साहित्याची. त्यानंतर यंदा कोरोनामुळे महाप्रसाद नसला तरी महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे ऑनलाईन पूर्वनोंदणी केलेल्या भाविकांसाठी घरपोच प्रसादाची सुविधा उपलब्ध केली आहे. तर देवस्थान समितीने नैवेद्यापुरता व सेवकांसाठी प्रसाद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यानिमित्ताने महाप्रसादाच्या पूर्वीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो आहे. 
मंदिरात नवरात्रोत्सवानंतर पौर्णिमेला होणाऱ्या या महाप्रसादाला स्थानिक भाविकांबरोबरच परगावाहूनही मोठ्या संख्येने भाविक येतात. छत्रपती राजाराम महाराजांचे निधन आणि रेशनिंगच्या काळात बंद असलेला महाप्रसाद 31 ऑक्‍टोबर 1955 ला पुन्हा सुरू झाला आणि त्यासाठी तब्बल सात-तास भाविकांची रीघ लागली होती. पंधरा ते वीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी एल. बी. नाडकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी बाराला सुरू झालेला हा महाप्रसाद सायंकाळी सातपर्यंत सुरू होता. सरकारची कुठलीही मदत न घेता भाविकांच्या देणगीतून हा महाप्रसाद झाला होता. आणि त्यावेळी एक हजाराहून अधिक रक्कम जमा झाली होती. पंधरा ते वीस हजार भाविकांनी त्याचा लाभ घेतला. विशेष म्हणजे ज्यांना प्रत्यक्ष महाप्रसादासाठी उपस्थित रहाता आले नाही, त्यांना पोस्टाने प्रसाद पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आणि हैदराबाद, मुंबई येथूनही महाप्रसादासाठी भाविक आल्याच्या जुन्या नोंदी आजही मिळतात. 

परंपरा कायम... 
हल्ली विविध सण, उत्सवांच्या निमित्ताने अनेक ठिकाणी महाप्रसाद होतात. बदलत्या काळात त्यातील मेन्यू बदलत गेले. किंबहुना "मेन्यू'वर महाप्रसादाचीही प्रतिष्ठा ठरवली जावू लागली आहे. मात्र, अंबाबाई मंदिरात होणाऱ्या महाप्रसादाची परंपरा बदलत्या काळातही जपली गेली आहे. गव्हाची खीर, भात आणि भाजी मिक्‍स आमटी अशा स्वरूपाचा हा महाप्रसाद तयार करण्यासाठी पंचवीसहून अधिक आचारी कार्यरत असतात.
 संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com