कोल्हापूर जिल्ह्यात 851 मोटारी सीएनजीवर

 कोल्हापूर जिल्ह्यात 851 मोटारी सीएनजीवर
कोल्हापूर जिल्ह्यात 851 मोटारी सीएनजीवर

कोल्हापूर ः मुंबई-पुण्या पाठोपाठ आता कोल्हापुरात ही सीएनजी (कॉम्प्रेस्ड्‌ नॅचरल गॅस)ची वाहने धावू लागली आहेत. जिल्ह्यात सीएनजी पंप सुरू झाले आहेत. तेथील पुरवठा नियमित असल्यामुळे जिल्ह्यात पेट्रोलवर चालणाऱ्या मोटारींचे रुपांतर आता सीएनजीवर होत आहे. जानेवारी 2020 पासून जिल्ह्यात एकूण 851 मोटारी सीएनजीवर सुरू झाल्या आहेत. यापैकी 402 मोटारीचे नव्याने नोंदणी झाली आहे, तर इतर जिल्ह्यातील मोटारींनी ही त्यांचे रजिस्ट्रेशन कोल्हापुरात करून घेतले आहे. अशा 449 मोटारी असल्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. 
वाहनांना पेट्रोल-डिझेलला पर्यायी इंधन म्हणून "एलपीजी' आणि "सीएनजी' गॅस पुढे आले. दहा वर्षापूर्वीच्या काळात शहरातील सर्व रिक्षांना एलपीजी किट बसविण्यासाठी आंदोलन झाले. घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर रिक्षामध्ये होत होता. त्यामुळे एलपीजी गॅस पंपासाठी रिक्षा चालकांसह प्रशासन सकारात्मक होते. त्यातून कोल्हापूर शहर परिसरात सहा एलपीजी पंप झाले. सरनोबतवाडी, राजारामपुरी, कसबा बावडा, मोरेवाडी, जवाहरनगर, सानेगुरूजी वसाहत ते पुईखडी रोड अशा ठिकाणी हे पंप होते. मात्र कालांतराने यातील काही पंप बंद झाले. त्यामुळे सीएनजीची मागणी वाढू लागली होती. त्यातून जिल्ह्यातील पहिला वाठार (ता.हातकणंगले) येथे पंप सुरू झाला. मात्र त्यानंतर सीएनजीचे रजिस्ट्रेशन कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात होत नव्हते. त्यामुळे वाहनांना सीएनजी कीट बसविणे आणि ते अधिकृत करून घेणे मुश्‍कील होते. परिणामी त्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. 
जिल्ह्यात जानेवारी 2020 पासून अधिकृत सीएनजी कीट असलेल्या मोटारीचे रजिस्ट्रेशन कोल्हापुरात होऊ लागले. त्यामुळे ही संख्या आता वाढत जात आहे. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस भडकत आहेत. त्यामुळे पेट्रोल पेक्षा पन्नास ते साठ टक्के नफा मिळवून देणारा सीएनजी ग्राहकांना योग वाटत आहे. त्यामुळेच पेट्रोलवर चालणाऱ्या मोटारी आता सीएनजी मध्ये रुपांतरीत केल्या जात आहेत. 

कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात सीएनजी मोटारींचे रजिस्ट्रेशन जानेवारी 2020 पासून सुरू केले आहे. परजिल्ह्यातील वाहनांनी सुद्धा कोल्हापुरात रजिस्ट्रेशन करून घेतले आहे. लॉकडाउनचा कालावधी वगळता जिल्ह्यात 851 मोटारींची नोंदणी झाली आहे. 

डॉ.स्टीव्हन अल्वारीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर 
-------------- 
जिल्ह्यात एकूण चार सीएनजी पंप 
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शुल्क ः सुमारे 500 रुपये 
सीएनजी कीट कंपनीनुसार वेगवेगळी किंमत ः अंदाजीत 40-50 हजार रुपये 
पेट्रोल आणि सीएनजी कीट ः अंदाजीत 40-50 हजार रुपये 
कोल्हापुरात कीट बसवून दिले जाते. 
-संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com