७० वर्षांच्या दोन आजीबाईंनी भरला ग्रामपंचायत फॉर्म ; मी निवडून येणार हाय म्हणत केली भल्याभल्यांची बोलती बंद

अजित माद्याळे | Thursday, 31 December 2020

70 वर्षावरील दोन आजीबाईंनी दाखल कलेली आपली उमेदवारी तरूणांना प्रेरणादायी ठरल्या आहेत.

गडहिंग्लज (कोल्हापूर) : एकवीस वर्षे पूर्ण झालेले आणि त्यानंतर हयात असणाऱ्या कोणत्याही वर्षाच्या नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उतरायला चालते. तरूणांना शोधून उमेदवारी देण्यात गावपुढाऱ्यांची धावपळ उडत असताना आता 70 वर्षावरील दोन आजीबाईंनी आपली उमेदवारी दाखल करून तरूणांना प्रेरणादायी ठरल्या आहेत.

गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील हौशाबाई दुंडाप्पा कांबळे (वय 75) आणि मुंगूरवाडीतील सुशिला हरी सुतार (वय 70) अशा या दोन उत्साही आजीबाईंची नावे आहेत. कोणत्याही निवडणुकीत तरूणांना उमेदवारी देण्याची प्रथा रूढ होत आहे. तरूणांना राजकीय कवाडे उघडे करून देण्यात विविध पक्षातही स्पर्धा तयार झाली आहे. अशा वातावरणात गिजवणेच्या कांबळे व मुंगूरवाडीच्या सुतार यांनी उमेदवारी दाखल करून या तरूणांना प्रेरणादायी ठरावे असे काम केले आहे.

हेही वाचा -  गायत्री पुढे जाताच मागून किंकाळ्या ऐकू आल्या, फिरुन पाहिले तर मैत्रिण झेलत होती तलवारीचे वार -

Advertising
Advertising

हौशाबाई या देवदासी आहेत. गावात त्यांचा संपर्कही आहे. यामुळे या आजीबाईने निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आणि नातेवाईकांनीही तिची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हौशाबाई कांबळे यांनी मास्क लावून मुलाच्या मोटरसायकलवरून येत निवडणूक अधिकाऱ्याकडे स्वत:चा ऑफलाईन अर्ज सादर केला आहे.

याबाबत हौशाबाई म्हणतात, 'ग्रामपंचायत निवडणूक मी लढवणार हाय. मी निवडून येवून गावचा विकास करणार हाय. मला विकास करण्यासाठीच लोकांनी उभी केल्यात. सगळ्यांच मी चांगल करणार हाय.' मुंगूरवाडीच्या सुशिला सुतार यांनीही शेवटच्या दिवशी आपल्या नातेवाईकांसोबत येवून अर्ज दाखल केला आहे. त्या 70 वर्षाच्या आहेत. तरूणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह यावेळी लक्षवेधी ठरला.

हेही वाचा - पराभूत झाल्याच्या रागातून विरोधी गटाकडून विजयी पॅनेलच्या प्रमुखाचा खून -

शेवटच्या दिवशीच सकाळी दहाच्या ठोक्‍याला म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या आवारात आल्या. यावेळी तिला बोलते केल्यानंतर ती म्हणते, 'गावातल्या लोकांनी निवडणुकीला उभं केलंय. म्हणून मी फार्म भरायला आली हाय. मला निवडणूक लढवायची हाय. अनुभव विचारल्यावर ती सांगते, माझे मालक हरी सुतार आधी ग्रामपंचायतीत होते. त्यांच्याबरोबर राहून थोडी माहिती झालीया.'

 

संपादन - स्नेहल कदम