esakal | भावाला केलेला नंतरचा कॉल उचलला डॉक्टरांनी ; जिगरी दोस्तांची ती सफर ठरली शेवटची

बोलून बातमी शोधा

accident in sangli phata kolhapur two friends dead in accident

सांगली फाटा परिसरातील टोलनाक्‍यावरील दुभाजाकाला त्यांची मोटार धडकून भीषण अपघात झाला.

भावाला केलेला नंतरचा कॉल उचलला डॉक्टरांनी ; जिगरी दोस्तांची ती सफर ठरली शेवटची

sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर : सांगली फाटा परिसरातील टोल नाक्‍याच्या दुभाजाकला मोटार धडकून झालेल्या भिषण अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू झाला. करण रमेश पोवार (वय 27) आणि सूरज सदाशिव पाटील (वय 27, दोघे रा. ताराराणी कॉलनी, रेसकोर्स नाका) अशी त्यांची नावे आहेत. याची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली. 

याबाबत पोलिसांनी व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती, करण पोवार व सूरज पाटील हे दोघे ताराराणी कॉलनीत राहतात. ते दोघे एकाच वयाचे असून लहानपणा पासूनचे मित्र आहेत. ते दोघे शनिवारी कामानिमित्त मोटारीतून बाहेर गावी गेले होते. रात्री उशिरा घरी परतत असताना सांगली फाटा परिसरातील टोलनाक्‍यावरील दुभाजाकाला त्यांची मोटार धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात सूरज पाटील हे जागीच ठार झाले.

हेही वाचा - दिंडी चालली हो..!, माघवारीसाठी वारकऱ्यांनी धरली पंढरपूरची वाट -

गंभीर जखमी झालेल्या करण पोवार यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रपरीवारांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती. दरम्यान उपचार सुरू असताना किरण यांचा आज मृत्यू झाला. करण व सूरज हे दोघे सामान्य कुटुंबातील असून ताराराणी मित्र मंडळाचे कार्यकर्ते होते. सूरज पाटील यांचा कळंबा व जवाहरनगरात स्क्रॅपचा व्यवसाय आहे. त्यांच्या मागे आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. तसेच करण पोवार यांचे वडील महानगरपालिकेत सुपरवाईझर म्हणून काम करत होते. कोरोना संकटातच त्यांचा चार महिन्यापूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या जागी अनुकंपाखाली नोकरीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला होता. त्यांच्या मागे आई, मोठा भाऊ असा परिवार आहे. त्या दोघांच्या अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. 

एकुलता एक आधार

दोन बिहिणींचा लग्न झाल्यानंतर सूरज हा घरचा एकुलता एक आधार होता. त्याच्या अशा जाण्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 

तो शेवटचा फोन ठरला

शुक्रवारी रात्री पावणे आकराच्या सुमारास करण पोवार यांच्या भावाने त्यांना फोन केला होता. घरी कधी येणार याची विचारणा केली होती. त्यावेळी करणने जेवण करून अर्धातासात येतो असे त्यांनी भावाला सांगितले होते. पण अर्धातास होऊन गेला तरी ते घरी आले नाहीत. म्हणून भावाने पुन्हा त्यांना फोन केला. पण हा फोन ऍब्युलन्समधील डॉक्‍टरने उचलला. हा ज्यांचा फोन आला त्यांचा अपघात झाला आहे. तुम्ही सीपीआरला या असे तिकडून त्यांना सांगण्यात आले. करण यांना केलेला तो फोन अखेरचाच ठरला. 

हेही वाचा -  शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पंधरा लाखांचे नुकसान -

संपादन - स्नेहल कदम