जयसिंगपुरात विनामास्क फिरणाऱ्या आठशे जणांवर कारवाई

Action Against 800 People In Jaysingpur Kolhapur Marathi News
Action Against 800 People In Jaysingpur Kolhapur Marathi News

जयसिंगपूर : "नो मास्क, नो एन्ट्री'चे फलक शहरातील दुकानांमध्ये दर्शनी भागावर दिसत असले तरी या नियमाचे तंतोतंत तंतोतंत पालन मात्र होताना दिसत नाही. शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या अनेक जणांच्या तोंडावर मास्क दिसत नाहीत. अनेक जण मास्कचा वापर करतात पण ते हनुवटीवर असल्याने मास्क म्हणजे दंडापासून पळवाट असल्याची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांवर मात्र वाहतूकीला शिस्त लावण्याबरोबर विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईही करावी लागत असल्याने त्यांच्यावर दुहेरी कामाचा ताण पडला आहे.

जयसिंगपूर पोलिसांनी आतापर्यंत जवळपास आठशे विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंडाच्या पावत्या फाडल्या आहेत. शासनाने दिलेल्या शिथीलतेचा फायदा घेत बहुतांश वाहन चालक आणि नागरीक विनामास्क बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाची लाट लक्षात घेऊन शासनाने तयारी सुरू केली असताना नागरीकांना मात्र कोरोनाचे गांभीर्य संपले की काय अशीच स्थिती शहरातील विविध मार्गावर फिरणाऱ्या नागरीकांकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. वाहनधारक आणि नागरीकांचा मुक्त वावर कोरोनाला निमंत्रण देणारे ठरणार आहे. 

नगरपालिकेच्या मुख्याधिकारी टिना गवळी आणि जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंडाची कारवाई सुरू केली. काही दिवस या दहशतीमुळे नागरीकांकडून मास्कचा वापर केला गेला. मात्र, नंतरच्या काळात बहुतांश नागरीकांकडून मास्कचा वापर होताना दिसत नाही.

दिवाळीपासून तर शहरात मास्कचा वापर बहुतांश प्रमाणात कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. शहरातील क्रांती चौकात गेल्या पाच ते सहा महिन्यापासून अखंडीतपणे विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. 
दुकानांमध्ये नो मास्क नो एन्ट्रीचे बोर्डही आता सवयीचा भाग बनले आहेत. दुकानांमध्ये विनामास्क ग्राहकांची गर्दी दिसत असताना दुकानदारांकडूनही मास्कसाठी ग्राहकांना आग्रह म्हणावा तसा केला जात नसल्याचे दिसते. 

खबरदारी घेण्याची गरज
गेल्या पाच-सहा महिन्यापासून विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांवर दंडाची कारवाई केली जात आहे. आतापर्यंत जवळपास आठशेहून अधिक विनामास्क लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट गृहीत धरुन शासनाकडून उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात असताना नागरीकांकडूनही खबरदारी घेण्याची गरज आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहणार आहे. 
- सागर मगदूम, वाहतूक पोलिस, जयसिंगपूर 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com