कोल्हापुरात कृषी विधेयका विरोधात  कॉंग्रेस सत्याग्रह आंदोलन

Against the Agriculture Bill Congress Satyagraha movement kolhapur
Against the Agriculture Bill Congress Satyagraha movement kolhapur

कोल्हापूर : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयका विरोधात आज जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्ह्यातील कॉंग्रेसचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सहभागी झाले. 


देशातील भाजप सरकारने नवीन कृषी धोरण आणले आहे, आधीच खते, बी बियाणे यांचे दर वाढल्याले असताना उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला भाव नाही शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. भाजप सरकारने आणलेल्या नवीन कृषी धोरणामुळे देशातील गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी पूर्णतः उद्धवस्त होऊ शकतो. तसेच नव्या कामगार धोरण आणि शेती धोरणामुळे सर्वसामान्यांना मोठी आर्थिक झळ बसणार आहे. यासाठी आज कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेस कमिटीच्या बाहेर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. 


आंदोलनात आमदार चंद्रकांत जाधव, जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील, उपमहापौर संजय मोहिते, सुरेश कुराडे, सागर चव्हाण, सचिन चव्हाण, जय पटकारे, मोहन सालपे, विक्रम जरग, जिल्हा कॉंग्रेस सचिव संजय पोवार-वाईकर, करवीर तालुका अध्यक्ष शंकरराव पाटील, कागल तालुका अध्यक्ष शिवाजी कांबळे, चंदगड तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई, पार्थ मुंडे, दीपक थोरात, उमेश पोर्लेकर, सुलोचना नायकवडे, सरलाताई पाटील, संध्या घोटने, लीला धुमाळ, चंदा बेलेकर आदी उपस्थित होते.  

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com