आजऱ्यात कृषी पर्यटनाला मिळणार चालना

रणजित कालेकर
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

आजरा तालुक्‍यातील प्रगतशील, तरूण शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाबाबत अभ्यास दौरा केला. पराशर कृषी पर्यटनकेंद्र राजूरी (ता. जून्नर) जि. पुणे येथे भेट देवून विविध गोष्टींची माहिती घेतली. याच धर्तीवर आजरा तालुक्‍यात कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे तालुक्‍यात कृषी पर्यटनाला चालना मिळणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तीन दिवशीय शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरा झाला. 

आजरा : आजरा तालुक्‍यातील प्रगतशील, तरूण शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाबाबत अभ्यास दौरा केला. पराशर कृषी पर्यटनकेंद्र राजूरी (ता. जून्नर) जि. पुणे येथे भेट देवून विविध गोष्टींची माहिती घेतली. याच धर्तीवर आजरा तालुक्‍यात कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे तालुक्‍यात कृषी पर्यटनाला चालना मिळणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तीन दिवशीय शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरा झाला. 

अलिकडील दहा वर्षात कृषी पर्यटनाची संकल्पाना रुढ होवू लागली आहे. यासाठी कृषी विभागाकडून जाणीवपुर्वक पावले उचलली जात आहेत. शहरी लोकांना ग्रामीण जीवन व ग्रामसंस्कृतीची ओळख करून देण्याबरोबर शेतीमध्ये विविध प्रयोग व त्याचबरोबर शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीचे प्रयोग यशस्वी होत आहेत.

जागतिकीकरणात पर्यटन उद्योगाच्या मुख्य वर्तुळावर शेतकरी येत असल्याने शेतीला जोड धंदा म्हणून अशी केंद्र तयार होवू लागली आहेत. अनंत अडचणीत असलेल्या शेती उद्योगात हे आश्‍वासक चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषी विभाग व एकात्मिक कृषी विकास कार्यक्रम (आत्मा) अंतर्गत प्रशिक्षण सहलीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्‍यातील कृषी पर्यटनाशी निगडीत प्रगतशील शेतकरी व तरुणांनी यामध्ये सहभाग घेतला होतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील 35 शेतकरी या दौऱ्यात सहभागी झाले होते. यामध्ये आजरा तालुक्‍यातून 7 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. पराशर कृषी केंद्राचे प्रमुख मनोज हाडवळे यांनी कृषी पर्यटनाविषयी मार्गदर्शन केले. द्राक्ष व ऊसाची शेतीला प्रक्षेत्र भेट, या केंद्रातील शेती, शेतीपुरक व्यवसाय, राहण्याची सोय, जेवण त्याचबरोबर पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधांची माहीती शेतकऱ्यांनी घेतली. या वेळी हाडवळे यांनी कृषी पर्यटन केंद्र तयार करतांना येणाऱ्या विविध चढउतार, अडचणी, आर्थिक अडचणी, संकटांना सामोरे जावे याबाबतही मार्गदर्शन दिले. पर्यटन केंद्राबद्दल माहीती दिली. समाजातील विशिष्ट वर्गांसाठी अभ्यास सहलीचे आयोजन करता येते असे सांगितले. 

कृषी पर्यटनाला मोठा वाव
आजरा तालुक्‍यात कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. येथील शेतकरी कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी इच्छुक आहेत. पण त्यांना पुरेशे, असे मार्गदर्शन मिळत नाही. यासाठी कृषी विभाग व आत्मांतर्गत हा प्रशिक्षण दौरा झाला. शेतकऱ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे तालुक्‍यात पर्यटनाला चालना मिळेल. 
- अमित यमगेकर. सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा, आजरा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agri Tourism Will Get Boost In Ajara Kolhapur Marathi News