शेतकरी बांधवांनो तुम्हाला भाजीपाला विकायचाय तर, अशी मिळवा ऑनलाईन परवानगी.... 

The agriculture department has started giving direct online permission to supply the vegetables.
The agriculture department has started giving direct online permission to supply the vegetables.

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेला लॉकडाऊन, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी उडालेली धांदल सर्वत्र पाहायला मिळत आहे. कृषी विभागाने यावर नामी शक्कल लढवत भाजीपाला पुरवण्यासाठी थेट ऑनलाईन परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. ही परवानगी घेण्यात शेतकरीच आघाडीवर असल्याचे आकडेवारी दिसत आहे. जिल्ह्यातील तब्बल 202 शेतकऱ्यांनी ऑनलाइन द्वारे भाजपाला विक्रीची परवानगी घेतली आहे. शेतकऱ्या पाठोपाठ 61 व्यापाऱ्यांनी ऑनलाईन परवानगी घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात भाजी विक्री सुरू केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासनाने लॉक डाऊन घोषणा केली आहे. परिणामी जनजीवन प्रभावित झाले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी भाजीपाला ,औषध विक्री करण्यासाठी मात्र परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी देत असताना काही अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत. भाजीपाल्याची विक्री आणि वाहतूक करण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे .मात्र जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी धावपळ करू नये आणि कार्यालयात गर्दीही होणार नाही, या उद्देशाने त्यांनी ऑनलाईन परवानगी देण्यास सुरुवात केली आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक यांचेसह तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून परवानगी दिली जात आहे. मागील चार दिवसात एक-दोन नव्हे तर तब्बल 202 शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्री आणि वाहतुकीची परवानगी घेतलेली आहे. 61 व्यापाऱ्यांनीही अशी परवानगी घेवून भाजीपाला विक्रीस सुरुवात केली आहे. भाजीपाला विक्रीसाठी आत्मा या प्रकल्पातून तयार झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यासह शेतकरी गटांना कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. 

भाजीपाल्याची आवक वाढत आहे, काळजीचे कारण नाही - वाकुरे

सुरुवातीला लॉक डाऊनलोड केल्यानंतर काही दिवस भाजीपाल्याची टंचाई होती. मात्र आता ही टंचाई राहिली नाही .जिल्ह्याच्या पूर्व भागात चांगल्या प्रमाणात भाजीपाला निर्माण होत आहे. हा भाजीपाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती त देखील पाठवण्यात येत होता. मात्र तो थांबवण्यात आला असून जिल्ह्यांतर्गत असलेली भाज्यांची गरज भागवली जात आहे. भाजी विक्री आणि वाहतुकीसाठी शेतकरी, व्यापाऱ्यांना थेट ऑनलाइन परवाना दिला जात आहे. अजूनही ज्यांना परवाना हवा असेल त्यांनी 9881053400 या व्हॉट्स अॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com