आजऱ्याच्या उपनगराध्यक्षांचा राजीनामा, रिक्त जागेवर "यांना' संधी शक्‍य

Ajara Vice Mayor Resigns Kolhapur Marathi News
Ajara Vice Mayor Resigns Kolhapur Marathi News

आजरा : आजरा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज (ता. 10) नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांच्याकडे राजीनामा सूपूर्द केला. दिवसभरात नगरपंचायतीच्या राजकीय वर्तुळात मोठ्या राजकीय घडामोडीनंतर सायंकाळी त्यांनी राजीनामा सादर केला. दरम्यान, या रिक्त जागेवर ज्येष्ठ नगरसेवक विलास नाईक यांची वर्णी लागण्याची दाट शक्‍यता आहे. 

नगरपंचायतीची निवडणूक होवून अडीच वर्षांचा कालावधी लोटला. भाजप प्रणीत आजरा विकास आघाडी सत्तेवर आली. याच आघाडीतून नाईकवाडी निवडून आले होते. त्यांना प्रथम उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली. कालांतराने सत्ताधारी आघाडीचे नेते व उपनगराध्यक्ष नाईकवाडे यांच्यात मतभेद झाले. 

चक्रानुक्रमे आघाडीतील इतरांना या पदावर संधी देण्याचे ठरल्याने सताधारी आघाडीचे नेते अशोक चराटी यांनी नाईकवाडी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. पण नाईकवाडी यांनी राजीनामा देण्यास असमर्थता दर्शवली होती. आज बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर सायंकाळी नाईकवाडी यांनी राजीनामा दिला. आजरा शहराच्या विकासासाठी राजीनाम्याचा निर्णय घेतला. पुढे शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नाईकवाडी यांनी सांगितले. आता ज्येष्ठ नगरसेवक विलास नाईक यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्‍यता आहे. राजीनामा लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. 

संपादन - सचिन चराटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com