अंबाबाई मंदिरात उद्यापासून किरणोत्सव ; भाविकांसाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था 

ambabai kirnotsav sohla kolhapur news
ambabai kirnotsav sohla kolhapur news

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण किरणोत्सव सोहळ्याला उद्या (शुक्रवार) पासून प्रारंभ होणार आहे. पूर्वीपासून 31 जानेवारी ते दोन फेब्रुवारी या काळात किरणोत्सव व्हायचा. पण, अभ्यासानंतर आता हा सोहळा दोन दिवस अगोदर होत असल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. देवस्थान समितीच्या वतीने मंदिर परिसरात एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली जाणार आहे. 

दरम्यान, सलग पाच दिवस किरणोत्सव होणार असून त्याच्या नोंदी ठेवल्या जाणार असून किरणोत्सवाच्या अंतिम तारखांबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. आज पूर्वसंध्येला मावळतीच्या सूर्यकिरणांची पाहणी झाली. मात्र, किरणोत्सव मार्गात ढगांचा अडथळा आला. 

अंबाबाई मंदिरात 31 जानेवारी, एक व दोन फेब्रुवारी या काळात पहिला तर नऊ ते अकरा नोव्हेंबर या काळात दुसरा असे वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळे होतात. मात्र, बदलत्या खगोलीय घडामोंडीमुळे त्याच्या तारखांमध्ये बदल झाला आहे का, याचा अभ्यास गेली काही वर्षे सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर देवस्थान समितीने दोन वर्षांपासून पाच दिवसांचा किरणोत्सव जाहीर केला आणि त्यानुसार किरणोत्सवाच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com