श्री. अंबाबाईच्या अलंकारांना मिळाली झळाळी

 Ambabai's ornaments got glitter
Ambabai's ornaments got glitter

कोल्हापूर ः नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अंबाबाईच्या दागिन्यांची स्वच्छता आणि लकाकीचे (पॉलिश) काम करण्यात आले. गरुड मंडपात कडेकोट बंदोबस्तात दागिन्यांची आज कारागिरांनी स्वच्छता केली. भाविकांनी लोकवर्गणीतून देवीला दिलेली सुवर्ण पालखीही चकचकीत केली. रोषणाई, मंदिराची स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. 
दरवर्षी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या आधी देवीचे दागिने स्वच्छ करण्यात येतात. गरुड मंडपात सकाळी नऊच्या सुमारास दागिने आणण्यात आले. नंतर त्यांची स्वच्छता आणि लकाकीही करण्यात आली. त्यानंतर दागिने देवीला घालण्यात आले. या वेळी सुवर्ण पालखीही चकचकीत केली. मंदिराची स्वच्छता अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर रोषणाईचे कामही अंतिम टप्प्यात आले. सराफ व्यावसायिक श्री. कवठेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दागिन्यांची स्वच्छता केली. या वेळी देवीचे वंशपरंपरागत खजिनदार महेश खांडेकर परिवारातील सदस्यांसह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, व्यवस्थापक धनाजी जाधव, शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. 

अंबाबाईचे दागिने 
नित्यालंकार 
ठुशी, बोरमाळ, 16 पदरी चंद्रहार, म्हाळुंगे, मोर, कुंडल, नथ 
------------ 
उत्सवमूर्तीचे दागिने 
ठुशी, बोरमाळ, चाफेकळी माळ, पुतळ्याची माळ, लाल मण्यांची माळ, कंडी, किरीट, कुंडल 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com