esakal | जिवलग मित्र धनंजय मुंडेंवर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपावर अमोल कोल्हेंनी केलं मोठं वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

amol kolhe dhananjay munde sangli

मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे

जिवलग मित्र धनंजय मुंडेंवर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपावर अमोल कोल्हेंनी केलं मोठं वक्तव्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे.

"आमच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना किती नैतिकता पाळली होती? असा सवाल करतानाच विरोधकांनी आधी स्वत:ला आरक्षात पाहावे," असा घणाघाती हल्ला अमोल कोल्हे यांनी केला आहे.

अमोल कोल्हे सांगलीतील म्हैसाळ येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपा नेत्यांना सुनावलं आहे. “विरोधकांनी आता स्वतःला आरशात पाहिलं पाहिजे. त्यांनी जर आरशात पाहिलं तर त्यांच्या मागण्या रास्त ठरतील असं वाटत नाही”. यावेळी त्यांनी धनंजड मुंडे यांनी आरोपांवर स्पष्टीकरण दिलं असून तेच यावर अधिक बोलतील असं सांगितलं.

अमोल कोल्हे यांनी यावेळी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या मुद्द्यावरुनही भाजपावर निशाणा साधला. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला ज्यांनी रायगडावर ढोल वाजवले, ज्यांनी महाराजाच्या गड किल्ल्यांवर डेस्टिनेशन वेडिंग व्हावे म्हणून जी आर काढला हे लोक आम्हाला आता शिवभक्ती शिकवणार का?,” असा संतप्त सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला आहे. पाच वर्ष सत्ता असताना छत्रपती संभाजी महाराजांसाठी नेमके काय केले हा अशी विचारणा करत महाविकास आघाडी सरकारने छत्रपती संभाजी महाराजाचे नाव विमानतळला द्यावे ही केलेली मागणी स्तुत्य असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. औरंगाबाद ही औरंगजेबाची निशाणी आहे ती कोणालाही भूषणावह नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना साजेसे शहर असावे हे अशी सर्व शिवप्रेमीची मागणी आहे, तसे आंम्हालाही वाटते असे कोल्हे यावेळी म्हणाले. 

हे पण वाचा - हाडांच्या आरोग्यासाठी सोप्या थेरपींचा मंत्र

संपादन - धनाजी सुर्वे 

go to top