आणि घराच्या पडवीत घुसला बिबट्या

 And leopards entered the house
And leopards entered the house

सोळांकूर (कोल्हापूर)  : राधानगरी तालुक्‍यातील फराळे धनगरवाडा येथे आज पहाटे कुत्र्याचा पाठलाग करीत थेट घराच्या पडवीत बिबट्याने प्रवेश केला. कुत्र्याच्या भुंकण्याने शेजारी झोपलेली व्यक्ती जागी होताच बिबट्या रामाठ्याच्या तटातून पळून गेला. परिसरात वावरणारा बिबट्या थेट घरात घुसल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. जंगली प्राण्यांचा धोका वाढल्याने उपाययोजना कराव्यात अशी मागणी भयभीत झालेले ग्रामस्थ करीत आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज पहाटेस मौजे फराळे धनगरवाडा येथील माजी सरपंच धोंडिराम झोरे यांच्या पाळीव कुत्र्याचा बिबट्याने पाठलाग केला. त्या वेळी कुत्रे पडवीत पळत आल्याने बिबट्या त्याच्या मागे लागत पडवीत आला. त्या वेळी कॉटवर श्री. झोरे यांचे वडील, भाऊ झोपले होते. कुत्र्याचा भुंकण्यामुळे ते जागे झाले. त्या वेळी बिबट्या कुत्र्याला सोडून रामाठाच्या तटातून पळून गेला. कुत्र्याचे मानेवर बिबट्याचे दाताचे व्रण दिसून आले. दरम्यान घराशेजारी चिखलामध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून आले. याबाबत गावामध्ये पाळीव जनावरे व गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आसनगाव धनगर वाड्यावर वावर 
बिबट्याच पायाचे ठसे प्रकाश झोरे यांना दिसून आल्याने आज पहाटे भांडणे, आसनगाव परिसरातील जंगलक्षेत्रात व पाणवठ्यावर बिबट्याचे ठसे मिळतात का याची पाहणी सुरू होती. त्याचवेळी ही घटना वनविभागास समजल्याने घटनास्थळी पाहणी केली. यावेळी राधानगरीचे वनपाल ए. जी. बिराडे, वनरक्षक आफ्रीन देवळेकर, वनकर्मचारी हिंदुराव पाटील व आनंदा पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com