आंध्रचा तोतापुरी आंबा गडहिंग्लज बाजारात

Andhra's Totapuri Mango In Gadhinglaj Market Kolhapur Marathi News
Andhra's Totapuri Mango In Gadhinglaj Market Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : येथील फळ बाजारात आंध्रप्रदेशचा तोतापुरी आंबा दाखल झाला आहे. आवक जेमतेम असल्याने दर अधिक आहेत. गेला महिनाभर तेजीत असणाऱ्या कांद्याची नवी आवक सुरू झाल्याने दर उतरले. आवक जास्त असल्याने पालेभाज्या, कोथिंबीर स्वस्त आहे. जनावरांच्या बाजारात म्हशींची आवक चांगली असून शेळ्या-मेंढ्यांना मागणी वाढली आहे. 

तोतापुरी आंब्याची आवक तशी दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यापासून सुरू होते; मात्र यंदा डिसेंबरमध्येच येथील फळ बाजारात तोतापुरी आंबा दाखल झाला आहे. हा आंबा आंध्रप्रदेशातून आला आहे. किलोला 150 ते 200 रुपये दर असल्याचे विक्रेते अशोक रणदिवे यांनी सांगितले. मोठ्या आकाराचा हा आंबा सव्वा ते अर्ध्या किलो वजनाचा आहे. नागपूर परिसरातून येणाऱ्या संत्र्यांचा दर 40 ते 60 रुपये किलो असा आहे. मोसंबींची आवक चांगली आहे. सोलापूर जिल्ह्यातून ऍपल बोरांची आवक वाढली आहे. पेरू 60 रुपये किलो, तर पपईचे आकारानुसार 15 ते 30 रुपयांपर्यंत दर आहेत. 

फळभाज्या, पालेभाज्या यांचा सरासरी 60 रुपये किलो असा दर आहे. हिरवी मिरची, गवार यांचे दर तेजीत आहेत. मेथी, पालक, कांदा पात, लाल भाजी यांच्या 100 पेंढयांना 400 ते 500 रुपये दर आहे. किळकोळ बाजारात 5 ते 6 रुपये असा दर आहे. कोथिंबीर 4 ते 5 रुपये पेंढी आहे. लसूणाचे दर कमी झाले आहेत.

या दोन्हींचे क्विंटलमागे 1000 रुपयांनी दर कमी झाल्याचे विक्रेते अमर नेवडे यांनी सांगितले. कांदा 2000 ते 4500 रुपये क्विंटल, तर 30 ते 40 रुपये किलो असा दर आहे. लसूण 4500 ते 9500 रुपये क्विंटल, तर 60 ते 110 रुपये किलो असा दर आहे. बटाट्याचा किलोचा 40 ते 50 रुपये दर आहे. जनावरांच्या बाजारात म्हशी व शेळ्या-मेंढ्यांची आवक चांगली असून मागणीमुळे दरही तेजीत आहेत. म्हशी 25 ते 80 हजार, तर शेळ्यामेंढ्या 3 ते 10 हजारांपर्यंत आहेत. 

हरभरा भाजी बाजारात 
थंडीच्या दिवसात मिळणारी हरभरा भाजी बाजारात दाखल झाली आहे. आंबट-गोड चवीच्या या भाजीला महिलांची अधिक पसंती असते. दहा रुपये ढिग असा दर आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com