अंगणवाडी लोकल; शिक्षण मात्र डिजिटल 

अंगणवाडी लोकल; शिक्षण मात्र डिजिटल 

कोल्हापूर : जिल्हा परिषद अंगणवाडी प्रवेशाचा गुगल फॉर्म, व्हॉट्‌सऍपवरून मुलांना कृतिपूरक शिक्षणाचे धडे, गरोदर महिलांची ऑनलाईन नोंदणी, या सर्व गोष्टी कदाचित स्वप्नवत वाटतील, पण हे वास्तवच आहे, अल्पशिक्षित अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीला डिजिटल स्वरुप दिले. फारसे पाठबळ नसतानाही अंगणवाडी सेविकांनी कोरोनाच्या संकटावर मात करून ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केली आहे. 
अंगणवाडी म्हटले विशिष्ट प्रकारचे विदारक चित्र असते. मात्र ग्रीांण भागातील जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांचे स्वरुप बदलू लागले आहेत. या परिवर्तनाचे मुख्य कारण आंगणवाडी सेविकांची निर्स्वार्थी सेवा हे आहे. अत्यल्प मानधनात आणि तुटपूंजा साधनांत प्रत्येक संकटावर या सेविका मात करतात. कोरोनाचे वैश्‍विक संकटात सर्व व्यवहार ठप्प झाले पण सेविकांनी मात्र यातून मार्ग काढला. वडणगे(ता.करवीर) येथील अंगणवाडी सेविका संगिता पवार यांनी प्रवेशाचा गुगल फॉर्म तयार केला. यावर पाल्याचे नाव, पालकांचे नाव, पत्ता, आधारकार्ड क्रमांक, व्हॉट्‌स ऍप क्रमांक ही सर्व माहिती असते. ती भरून पालकंनी अंगणवाडी प्रवेश निश्‍चीत केले. त्यानंतर त्या पालकांच्या मोबाईलवर त्या मुलांना कृतिपूरक शिक्षणाचे व्हिडिओ पाठवले जाऊ लागले. आकार, रंग ओळख याचे व्हिडिओ पाठवले जातात. दिवसभर घरी कंटाळलेली मुले या निमित्ताने एका वेगळ्या जगात रममाण होतात. मनोरंजन आणि शिक्षण हे दोन्ही उद्देश साध्य होतात. पवार यांच्या या ऑनलाईन उपक्रमाचे अनुकरण जिल्ह्यातील विविध अंगणवाड्यांत होत आहे. 
यंदा लॉकडाऊमुळे गुढी पाडव्याला अंगणवाडी प्रवेश होऊ शकले नाहीत. मात्र गुगल फॉर्मने अंगणवाडीचे प्रवेशही झाले आणि व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून शिक्षणही सुरू झाले. मोबाईल ऍपवरून सर्व प्रकारच्या नोंदणीही होतात. 


गुढीपाडव्याला होणारा प्रवेश सोहळा यंदा झाला नाही. त्यामुळे गुगल फॉर्मचा वापर करून अंगणवाडी प्रवेश केले. फॉर्मबरोबर पालकांना उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ पाहायला मिळाले. काही खासगी शाळेतील मुलांनाही अंगणवाडीमध्ये प्रवेश घेतला. व्हॉट्‌सऍपवरून अध्यापन, अध्ययनही सुरू झाले. पालकांनकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतो. 
- संगिता पवार, अंगणवाडी सेविका. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com