कोल्हापूर बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती ; अशासकीय मंडळ बारगळे 

शिवाजी यादव
Wednesday, 5 August 2020

शेती उत्पन्न बाजार समितीत 24 जागांची भरती होणार होती. त्यासाठी चार हजार अर्ज आले होते, मात्र संचालक मंडळाने स्वतःच्या नात्यातील व्यक्तींना कायम स्वरूपी नोकरीत दिली.

कोल्हापूर - जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्हा निबंधकांनी बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी दुपारी बाजार समिती प्रशासक म्हणून पदभार घेतला. 

शेती उत्पन्न बाजार समितीत 24 जागांची भरती होणार होती. त्यासाठी चार हजार अर्ज आले होते, मात्र संचालक मंडळाने स्वतःच्या नात्यातील व्यक्तींना कायम स्वरूपी नोकरीत दिली. तसेच शाहू मार्केट यार्डातील काही जागा भाडेतत्त्वावर नगन्य भाड्यात दिल्या. यातून बाजार समितीचे अर्थिक नुकसान झाले. याबाबत शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणारे संचालक ऍड. किरण पाटील, भाजपचे नाथाजी पाटील तसेच भगवान काटे यांनी जिल्हा निबंधकाकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच सकाळमधूनही बेकायदेशीर कामाचा लेखा जोखा मांडलेला होता. त्याची दखल घेत जिल्हा निबंधकांनी चौकशी समिती नियुक्ती केली. 

त्यानुसार प्रदीप मालगावे आणि अन्य दोन अधिकाऱ्यांनी बाजार समिती कारभाराची चौकशी केली आहे. अशात संचालक मंडळ बरखास्त होऊ शकेल याचा अंदाज घेऊन 15 संचालकांनी सोमवारी राजीनामा दिला तर सभापती व उपसभापतीनी काल मंगळवारी राजीनामे दिले. 

संचालक मंडळाची आज मुदत संपत होती. याच वेळी जिल्हा निबंधकांनी बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले. त्यानुसार श्री मालगावे यांनी बाजार समितीत येऊन पदाचीसुत्रे स्विकारली. 

हे पण वाचाकोणत्याही क्लासशिवाय कोल्हापूरच्या पठ्ठ्याने मिळविले यूपीएससीत लखलखीत यश

 

अहवालास विलंब 
बाजार समितीतील बेकायदेशीर कामे झाल्याच्या तक्रारीस अनुसरून जिल्हा निबंधकांनी चौकशी समिती नियुक्त केली. त्यांचे चौकशीचे काम पूर्ण होत आले  आहे, मात्र अद्याप अहवाल सादर झालेला नाही. अहवाल सादर होण्यास वेळ लागत असल्याने बाजार समितीत उलट सुलट चर्चा होत आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of Administrator on Kolhapur Market Committee