esakal | कोल्हापुरच्या सुपुत्राला काश्मीरमध्ये वीरमरण
sakal

बोलून बातमी शोधा

army officer of kolhapur district from ajara hearse in kashmir baramulla in kolhapur

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात  बारामुल्ला जम्मू काश्मीर येथे ऋषीकेश हे जखमी होवून शहीद झाले. 

कोल्हापुरच्या सुपुत्राला काश्मीरमध्ये वीरमरण

sakal_logo
By
अशोक तोरस्कर

बहिरेवाडी (आजरा)  : आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे (वय २०) हे भारतीय सैन्यदलातील जवान शहिद झाले.

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात  बारामुल्ला जम्मू काश्मीर येथे ऋषीकेश हे जखमी होवून शहीद झाल्याचे प्राथमिक माहीती मिळाली आहे. ऋषीकेश दोन वर्षांपुर्वी सैन्य दलात भरती झाले आणि त्यांचे सैन्यातील ट्रेनींग पुर्ण होऊन ते ड्युटीसाठी जॉईन झाले होते. 

कोरोना लॉकडॉउनच्या काळात ते गावी होते. महिन्याभरापुर्वी ते ड्युटीवर हजर झाले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक  शिक्षण गडहिंग्लज मध्ये झाले होते.  शिवराज कॉलेज गडहिंग्लज येथे एन. सी. सी. प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर ते सैन्य दलात भरती झाले. त्यांच्या पश्चातआई वडील, एक बहीण असा परिवार आहे. ऐन दिवाळीत ऋषीकेश शहीद झाल्याची माहिती समजताच ते राहत असलेल्या देवूळ गल्लीसह गावावर शोककळा पसरली आहे.


 हेही वाचा - अरुण लाड यांच्या विजयात कोल्हापूर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल -

संपादन - स्नेहल कदम 

go to top