आशा वर्कर्सचे इचलकरंजी पालिकेसमोर ठिय्या

Asha Workers' Agitation In Front Of Ichalkaranji Municipality Kolhapur Marathi News
Asha Workers' Agitation In Front Of Ichalkaranji Municipality Kolhapur Marathi News

इचलकरंजी : कोरोनाच्या काळात केलेल्या अतिरिक्त कामाचे मानधन द्यावे, या मागणीसाठी आज आशा वर्कर्सनी पालिकेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. येत्या सोमवारपर्यंत बॅंक खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा अलका स्वामी व मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिली. 11 डिसेंबरपर्यंत मानधन जमा न झाल्यास 12 डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स संघटनेचे अध्यक्ष सदा मलाबादे यांनी दिला. 

शहरात 116 आशा वर्कर्स आहेत. कोरोनाच्या काळात सर्व्हेचे अतिरिक्त काम आशा वर्कर्सनी केले होते. त्यांना दर महा तीन हजार रुपये या प्रमाणे मानधन देण्याचा निर्णय 16 सप्टेंबररोजी झालेल्या पालिका सभेत घेतला होता. त्यानुसार सात महिन्यांचे मानधन देण्यात येणार आहे. पण त्याबाबत विलंब केला जात आहे. त्यामुळे संतप्त आशा वर्कर्सनी थेट पालिकेवर मोर्चा काढून प्रवेशव्दारासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नगराध्यक्षा स्वामी, मुख्याधिकारी खांडेकर, पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे आंदोलनस्थळी आले. जीव धोक्‍यात घालून सर्व्हे करणाऱ्या आशा वर्कर्सना वेळेत मानधन न दिल्याबद्दल सदा मलाबादे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. 

प्रशासनाकडून बोलतांना मुख्याधिकारी खांडेकर यांनी मानधन देण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून येत्या सोमवारपर्यंत खात्यावर मानधन जमा केले जाईल, असे सांगितले. आनंदोलनाचे नेतृत्व मलाबादे यांच्यासह सावित्री कुंभार, वृषाली माने, जलवंत भंडारे, नंदीनी करडे आदींनी केले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com