आशा वर्कर्सचा शासनाला अल्टिमेटम 

 Asha Workers' ultimatum to the government
Asha Workers' ultimatum to the government

कोल्हापूर ः राज्यातील आशा वर्कर्सनी सोमवार (ता. 28) पासून संपाचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संप न करण्याचे आवाहन केल्यानंतर संप मागे घेतला. असे असले तरी 13 ऑक्‍टोबरपर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीत, तर "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या सर्वेक्षण मोहिमेत सहभागी होणार नसल्याची माहिती आशा वर्कर व गटप्रवर्तक युनियनच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेतील सर्वेक्षणाची माहिती ऑनलाईन भरण्याची सक्ती केल्यास संप पुकारण्यात येईल, असा अल्टिमेटमही दिला.

त्या म्हणाल्या, ""आशा कर्मचारी कोरोना संकटाच्या काळात घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत. हे काम करताना कोरोना प्रतिबंधात्मक साधने दिलेली नाहीत. तसेच सुरवातीच्या काळात एन 95 मास्कची गरज असताना मास्कही दिलेले नाहीत. तसेच सर्वेक्षण करताना लागणारे मार्कर, पेन तर काही ठिकाणी त्याचे फॉर्मही आशा स्वयंसेविकांना मिळालेले नाहीत. कोरोना काळात सर्व्हे करता आशांना स्टेशनरी मिळालेली नाही. सर्व्हेमध्ये नागरिकांना इतर आजारांची माहिती घेण्यास सांगितली आहे; परंतु आयुष सर्व्हेदरम्यान हीच माहिती संकलित करून ती ऑनलाईनही भरली आहे. असे असताना एकच काम पुन्हा करण्यास सांगितले आहे. आयुष सर्व्हेचे काम केल्यानंतरही अद्याप मानधन मिळालेले नाही. सर्व्हेदरम्यान जिल्ह्यातील 40 आशा कोरोनाबाधित झाल्या. त्यासोबतच कंटेन्मेंट झोन, बफर झोन, रेड झोनमध्ये काम करावे लागते, अशा वेळी त्यांना कोणतेच कोरोनाप्रतिबंधक साधने दिली जात नाहीत.'' 
उज्ज्वला पाटील, विद्या जाधव, गीता गुरव, ज्योती तावरे, सुरेखा तिसंगीकर, पूनम कुंभार, सिटू जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, चंद्रकांत यादव आदी उपस्थित होते. 

एकच काम दोनदा 
आशा कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत. या सर्व्हेमध्ये इतर आजारांची माहिती घेण्यास सांगितली आहे; परंतु आयुष सर्व्हेदरम्यान हीच माहिती संकलित करून ती ऑनलाईनही भरली आहे. असे असताना एकच काम पुन्हा करण्यास सांगणे गैर असल्याचे नेत्रदीपा पाटील यांचे म्हणणे आहे.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com