कोल्हापुरी दणका! एशियन पेंटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जाहीरात हटवली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

एशियन पेंटने केलेल्या प्रोडक्टच्या एका जाहिरातीमुळे जिल्ह्यात नेटिझन्सनी संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर कोल्हापूरमध्ये जाहिरातीच्या विरोधात सोशल मीडियावर निषेधही व्यक्त करण्यात आला. 

कोल्हापूर : एशियन पेंटने केलेल्या प्रोडक्टच्या एका जाहिरातीमुळे जिल्ह्यात नेटिझन्सनी संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर कोल्हापूरमध्ये जाहिरातीच्या विरोधात सोशल मीडियावर निषेधही व्यक्त करण्यात आला. यातच जाहिरातीच्या व्हिडिओला डिसलाईक करण्यात येत होती. कोल्हापूरचा हा झटका पाहून एशियन पेंटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जाहिरात काढून टाकली. बुधवारी दिवसभरात 10 हजारांहून अधिक लोकांनी ही जाहिरात डीसलाईक केली. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला. आमदार ऋतुराज पाटील यांनी एशियन पेंटच्या कोल्हापूरला हिणवणाऱ्या जाहिरातीवर आक्षेप घेऊन ही जाहिरात बंद करावी आणि एशियन पेंटने कोल्हापूरकारांची माफी मागावी, अशी मागणी केली होती.

जाहिरातीचा युट्यूबवरील  व्हिडिओ डीसलाईक करा असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले होते. याला कोल्हापूरच्या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण जगभरातून पर्यटक अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. मात्र, जाहिरातमध्ये कोल्हापूरला हिनवले आहे. शिवाय आमच्या कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराज यांनी घडवलेले आहे. अनेक यशस्वी व्यक्ती या कोल्हापूरच्या मातीमध्ये घडल्या आहेत. त्या पद्धतीने जाहिरातीमध्ये कोल्हापूरला हिणवण्याचा प्रकार घडला आहे. हे आम्ही कधीही सहन करणार नाही. त्यामुळे याबाबत तात्काळ जाहिरात मागे घेऊन कोल्हापूरची माफी मागावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली होती .इतर सर्वच चॅनेलनी ही जाहिरात दाखवू नये अशी विनंतीसुद्धा आमदार ऋतुराज पाटील यांनी केली. ट्विटरच्या माध्यमातून आमदार ऋतुराज पाटील यांनी ही मागणी केली होती .

Image may contain: 2 people, text that says "+ 0:01/0:47 3 #ShyneJoSirfDikheMehengi Asian Paints Tractor Emulsior wala paint 1,577,483 views 6 days ago Shyne Shyne 480 10K + Share op asianpaints Download Save Asian Paints 930K subscribers SUBSCRIBE"

जाहिरातीद्वारे कोल्हापूरचा अपमान करून हिणवल्याचा प्रकार घडल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी म्हटले होते. शिवाय त्यांनी तात्काळ ही जाहिरात मागे घेऊन संपूर्ण कोल्हापूरवासीयांची माफी मागा, अशी मागणी केली होती. कोल्हापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला आणि तब्बल 10 हजार नागरिकांनी या जाहीरातीला डीसलाईक केले अखेर ही जाहीरात यू ट्यूब वरून काढण्यात आली.

हे वाचा - मित्रांची मिळाली साथ अन् विकी-मोहित जोडीने गीतांना दिला ‘बेधुंद’ संगीतसाज

हे कोल्हापूर आहे, करणार म्हणजे करणार
कोल्हापूरकरांनी ठरवले तर करणार म्हणजे करणारच अशी ख्याती आहे. याचा प्रत्यय आज या जाहिराती च्या प्रसारणावरून आला. तब्बल दहा हजारांहून अधिक लोकांनी ही जाहिरात डिसलाइक केले आणि अखेर कंपनीला कोल्हापूरकरांच्या झटक्याची दाद घ्यावी लागली. कंपनीने जाहिरात हटवल्यानंतर त्याबाबत स्पष्टीकरण मात्र दिलेले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: asian paints remove advertise from all social media