गावकऱ्यांनो ग्रामपंचायतीत शंभर रुपये भरा आणि मोफत 'हे' मिळवा...

अतुल मंडपे
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

अतिग्रे ग्रामस्थांनी तातडीने घरपट्टी व पाणी पट्टी बरोबरच सारे कर वेळेत भरल्यास मोफत हे मिऴणार...

हातकणंगले (कोल्हापूर) :  मोफत वायफाय बरोबरच दररोज 20 लिटर शुध्द पाणी ( आरओ ) माहिन्यातून तीन वेळा मोफत दळप, आणी प्रत्येक कुंटूबाला दोन कचरा कुंडी मोफत मिळेल मात्र त्यासाठी घरपट्टी व पाणी पट्टी शंभर भरा अशी अनोखी शक्कल कोल्हापूर जिल्हातील अतिग्रे ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायतीने लढवली असून घरपट्टी व पाणी पट्टीची जास्तीत जास्त वसूली होण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

ग्रामस्थांनी तातडीने घरपट्टी व पाणी पट्टी बरोबरच सारे कर वेळेत भरल्यास मोफत वायफाय बरोबरच महिन्यातून तीन वेळा मोफत दळप,कांडप, आरओचे दररोज 20 लिटर शुद्ध पाणी, याशिवाय घरातील कचरा साठवण्यासाठी दोन कचरा कुंडया मोफत देण्याची ऑफर ग्रामस्थांना दिली आहे. 1 मे पासून या सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहेत. सक्तीने घरपट्टी वसूल करण्या ऐवजी ग्रामस्थांना घर पट्टी व पाणी पट्टी भरण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने आखलेल्या या अनोख्या उपक्रमांची चर्चा सर्वत्र आहे.

हेही वाचा- बेळगावात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची तयारी.... -

1 मे पासून या सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध
कोल्हापूर सांगली महामार्गावर अतिग्रे हे गाव आहे. ग्रामपंचायतीचे प्रमुख स्त्रोत असणारा घरपट्टी, पाणीपट्टी, जास्तीत जास्त लोकानी भरण्यासाठी कोणत्या योजना आखता येतील यासाठी सरंपच सागर पाटील, व ग्रामसेवक ए.एस वाघ यांचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी फिरून त्यांनी ही संकल्पना राबवली आहे. सुविधा देताना प्रत्येक घटक यात सहभागी होईल याकडे विशेष लक्ष दिले आहे. तरूण वर्गासाठी वायफाय, माहिलासाठी दळप, कांडप, तर पाणी मोफत दिल्यास त्याचा संपुर्ण कुंटूबालाच त्याचा लाभ होईल. या हेतूनी ही योजना जाहीर करण्यात आली आहे

हेही वाचा - खानापूर शहरातील कोटींच्या सरकारी जमिनी कोणी हडपल्या ? -

आर्दश गाव बनविण्यासाठी प्रयत्न
 विरोधकाकडून नाहक आरोप करत जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अतिग्रे गावाला आर्दश गाव बनविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठीच अश्या विविध योजना राबविणार आहे.सत्तेत आल्यापासून शाहू आघाडीच्या वतीने जवळपास सव्वादोन कोटीची कामे पुर्ण केली आहेत, यामध्ये पाईपलाईन, डांबरीकरण, गटर्स, लाईट कॉक्रीट रस्ते, यासह विविध विकास कामांचा समावेश आहे. यासाठी उपसरंपच संदीप सुर्यवंशी, ग्रा.प सदस्य, पाडूंरग पाटील, उदय पाटील, विजय गोंधळी, विद्या पाटील मनिषा चौगुले, रुपाली कुंभार, प्रिंयाका शिंदे, ग्रामसेवक अजय वाघआदिचे विशेष प्रयत्न आहेत. 
सागर पाटील.. सरपंच अतिग्रे  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atigre Village Panchaya Ideal village In Atigre Kolhapur Marathi News