कोल्हापूर - पूर्ववैमनस्यातून तरूणावर कोयत्याने हल्ला

attack on boy in kolhapur
attack on boy in kolhapur

कोल्हापूर - कसबा बावड्यात पूर्ववैमनस्यातून झालेल्या कोयता हल्ला तरूण गंभीर जखमी झाला. सागर शामराव सुतार (वय 20, रा. आंबेगल्ली, कसबा बावडा) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी तिघा संशयित हल्लेखोरांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

गुन्हा दाखल झालेल्या संशयिताची नावे ः विकास वेताळे, साहिल शेख, सुदर्शन चव्हाण (तिघे रा. कसबा बावडा) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, सागर सुतार हा कसबा बावडा येथे राहतो. त्याचा रविवारी (ता.9) सकाळी तरूणांशी भांडण झाले होते. सागर हा सायंकाळी कसबा बावडा येथील एका कॉलेजच्या पार्किंगच्या कट्टयावर मित्र अक्षय, अमनसोबत बसला होता. त्यावेळी संशयित विकास वेताळे, साहिल शेख व सुदर्शन चव्हाण हे तिघे तेथे आले. त्यानी सकाळी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सागरला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. सागरने त्या तिघांच्या तावडीतून सुटून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डाव्या बाजूच्या बरगडीवर, डाव्या हातावर दुखापत झाली. त्याला नातेवाईकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

याबाबत जखमी सागरने सोमवारी रात्री उशिरा शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विकास, साहिल व सुदर्शन या तिघांवर गुन्हा नोंद झाला. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com